Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स 465 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: आजही (16 एप्रिल) शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीची नोंद झाली. सेन्सेक्स 457 अंकांनी घसरून 72,942 वर बंद झाला. निफ्टीही 124 अंकांनी घसरून 22,147 वर आला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 16 April 2024: आजही (16 एप्रिल) शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीची नोंद झाली. सेन्सेक्स 457 अंकांनी घसरून 72,942 वर बंद झाला. निफ्टीही 124 अंकांनी घसरून 22,147 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी क्षेत्रात झाली. PSU बँकिंग क्षेत्रातही विक्री झाली. फार्मा, ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये खरेदी झाली.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

मंगळवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण झाली, तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.

Share Market Today

शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये सर्व्होटेक पॉवर, गार्डन रीच शिप बिल्डर, डोडला डेअरी लिमिटेड, ईआयडी पॅरी, महिंद्रा हॉलिडेज, अशोक लेलँड, कोरोमंडल इंटरनॅशनल, सीएमएस इन्फो सिस्टीम्स यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

कोणते शेअर्स तेजीत?

आयशर मोटर्स, टायटन, ओएनजीसी, डिवीज लॅब, एचयूएल, एचडीएफसी बँक आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी सर्वाधिक तेजीत होते. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंडट्री, इंडसइंड बँक, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, हीरो मोटोकॉर्प आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्सचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारात घसरण असूनही, अमरा राजा बॅटरीज, एक्साइड इंडस्ट्रीज, एजिस लॉजिस्टिक्स, डीओएमएस इंडस्ट्री, गोदावरी पॉवर, ज्युबिलंट लाइफ आणि आयशर मोटर्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले, तर बंधन बँक, बाटा इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होते.

गुंतवणूकदारांचे 14,000 कोटींचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 16 एप्रिल रोजी 394.34 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 15 एप्रिल रोजी 394.48 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 14,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 14,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या 3 दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीची मुख्य कारणे-

1. इराण-इस्रायल युद्ध

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे मध्यपूर्वेतील वाढलेला तणाव असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तणावाचे मोठ्या प्रमाणावर युद्धात रूपांतर होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. अशा परिस्थितीत, बाजारात पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदार टाळत आहे आणि ज्या शेअर्समध्ये त्याला चांगला परतावा मिळाला आहे त्यातून ते माघार घेत आहेत.

2. जागतिक बाजारातून घसरणीचे संकेत

जगातील बहुतांश शेअर बाजारात विक्री होत आहे. सोमवारी आणि शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आशियाई बाजारात जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही घसरला आहे.

3. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

भारताच्या अर्थव्यवस्थेत कच्च्या तेलाची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्या किमतीतील बदलांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशातील बहुतांश क्षेत्रांवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सध्या 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. मार्च महिन्यात 6 टक्के वाढ झाली होती आणि एप्रिलमध्ये किमतीl आतापर्यंत सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

4. विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे काढणे

विदेशी गुंतवणूकदांचे (एफआयआय) गेल्या काही दिवसांत बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले ​​आहे. सोमवार, 15 एप्रिल रोजी त्यांनी भारतीय बाजारातून 3,268 कोटी रुपये काढले होते. यापूर्वी शुक्रवारी, 12 एप्रिल रोजी त्यांनी 8,027 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

5. यूएस रोखे उत्पन्नात वाढ

शेअर बाजारातील घसरणीमागे अमेरिकेतील रोखे उत्पन्नात झालेली वाढ हेही एक प्रमुख कारण आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, वाढत्या रोखे उत्पन्नामुळे यूएस फेडरल रिझर्व्हने यावर्षी व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी केली आहे. ते म्हणाले की जेव्हा बाँडचे उत्पन्न वाढते तेव्हा शेअर्ससारख्या जोखमीच्या मालमत्तेतील गुंतवणूक कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT