Share Market Today Sensex surpasses 75,000 mark, Nifty crosses 22,750 level for first time Sakal
Share Market

Share Market Opening: नवीन वर्षात शेअर बाजारात धमाका; सेन्सेक्सने गाठला 75,000चा टप्पा, निफ्टीनेही मोडले रेकॉर्ड

Sensex-Nifty Today: आज 9 एप्रिल रोजी शेअर बाजारात विक्रम झाला आहे. चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्षाच्या दिवशी बाजार उच्चांकावर उघडला. पहिल्या तिमाहीत सेन्सेक्स 75,000 च्या वर तर निफ्टी 22,700 च्या वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 9 April 2024 (Marathi News):

आज 9 एप्रिल रोजी शेअर बाजारात विक्रम झाला आहे. चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्षाच्या दिवशी बाजार उच्चांकावर उघडला. पहिल्या तिमाहीत सेन्सेक्स 75,000 च्या वर तर निफ्टी 22,700 च्या वर उघडला. जागतिक संकेतांचा बाजाराला पाठिंबा मिळत आहे.

Share Market Opening

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता, सर्व निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज, अदानी पोर्ट्स आणि मारुती सुझुकीचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. ज्या शेअर्समध्ये घसरण झाली त्या शेअर्समध्ये Divi's Lab, Tata Consumer, HUL, ITC, कोटक बँक, NTPC आणि ONGC चे शेअर्स होते.

Share Market Opening

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्सने बाजार उघडताच 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता, मात्र 15 मिनिटांनंतर बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्स वाढीसह तर 5 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्समध्ये वाढ होत आहे तर 22 शेअर्स घसरत आहेत.

S&P BSE SENSEX

बीएसईचे मार्केट कॅप वाढले

बीएसईचे मार्केट कॅप 401.82 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. काल, प्रथमच, बीएसईच्या मार्केट कॅपने 400 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता आणि ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

शेअर बाजारातील तज्ञांचे मत

मंगळवारी कच्च्या तेलात पुन्हा घसरण झाली. सोमवारी शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऑटो शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजार उच्चांकावर पोहचला. शेअर बाजारातील तज्ञांना अपेक्षा आहे की कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट असू शकतात, ज्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली.

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत?

रिलायन्स (RIL): कंपनीची दूरसंचार शाखा - रिलायन्स जिओने फेब्रुवारीमध्ये 3.59 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या ताज्या आकडेवारीनुसार जिओचा मार्केट शेअर 40 टक्क्यांवर पोहोचला आहे.

ऑटो: फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, RBI ने रेपो दर 14 महिने अपरिवर्तित ठेवण्याच्या निर्णयाचा किरकोळ वाहन विक्रीवर विपरित परिणाम होईल.

मुथूट मायक्रोफिन: कोची-आधारित मायक्रोफायनान्स संस्था, मुथूट मायक्रोफिनची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM) मार्च 2024 तिमाहीत वार्षिक 32 टक्क्यांनी वाढून 12,194 कोटी रुपये झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT