Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात चौफेर खरेदी; सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांनी वाढले, मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी

Share Market Closing Today: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला होता. सकाळपासून सेन्सेक्सचा वाढता कल दिसत होता. मोठ्या तेजीसह सेन्सेक्स-निफ्टी बंद झाले. BSE सेन्सेक्स 874.94 अंकांच्या किंवा 1.11 टक्क्यांच्या वाढीसह 79,468 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 7 August 2024: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला होता. सकाळपासून सेन्सेक्सचा वाढता कल दिसत होता. मोठ्या तेजीसह सेन्सेक्स-निफ्टी बंद झाले. BSE सेन्सेक्स 874.94 अंकांच्या किंवा 1.11 टक्क्यांच्या वाढीसह 79,468 वर बंद झाला. याशिवाय NSE चा निफ्टी 304.95 अंकांच्या किंवा 1.27 टक्क्यांच्या वाढीसह 24,297 वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि केवळ 5 शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी पोर्ट्स 3.42 टक्क्यांनी वाढून बंद झाला. यानंतर पॉवरग्रीड 3.20 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक 2.54 टक्क्यांच्या वाढीसह आणि एचयूएल 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. टेक महिंद्रा, टायटन आणि भारती एअरटेल देखील घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

बँक निफ्टीमध्ये तुफान तेजी

आज बँक निफ्टी 370.70 अंक किंवा 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 50,119 वर बंद झाला. 12 पैकी 10 बँक निफ्टी शेअर्स वर होते आणि इंडसइंड बँक, AU स्मॉल फायनान्स बँक खाली होते.

पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, बंधन बँकेसह स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वाढ झाली.

Share Market Closing

गुंतवणूकदारांनी 9.18 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 7 ऑगस्ट रोजी वाढून 448.77 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 439.59 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 9.18 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 9.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढले?

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 25 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.42 टक्के वाढ झाली आहे. यानंतर पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि इन्फोसिसचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

तर सेन्सेक्समधील उर्वरित 5 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यातही इंडसइंड बँकेचे शेअर्स 2.33 टक्क्यांनी घसरले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), टेक महिंद्रा, टायटन आणि भारती एअरटेलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT