Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात 3 दिवसानंतर तेजी; सेन्सेक्सची 300 अंकांची उसळी, कोणते क्षेत्र चमकले?

Sensex-Nifty Today: सलग 3 दिवसांच्या विक्रीनंतर गुरुवारी शेअर बाजारात खरेदी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सने जवळपास 300 अंकांची उसळी घेत 73,200 चा टप्पा पार केला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 18 April 2024 (Marathi News):

सलग 3 दिवसांच्या विक्रीनंतर गुरुवारी शेअर बाजारात खरेदी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सने जवळपास 300 अंकांची उसळी घेत 73,200 चा टप्पा पार केला आहे.

निफ्टी देखील 22,250 च्या वर 100 अंकांनी व्यवहार करत आहे. खरेदी विशेषतः मध्यम आणि लहान क्षेत्रात होत आहे. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्सकडून बाजाराला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

Sensex Today

आयटी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत

गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, विप्रो, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स वधारले तर इन्फोसिस आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण झाली .

Nifty Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवर ग्रिड, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, ओएनजीसी, हिंदाल्को आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वधारले तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, ॲक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

S&P BSE SENSEX

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह तर 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या सर्वाधिक तेजीत पॉवर ग्रिड, M&M, Infosys, TCS, L&T, विप्रो यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि घसरलेल्या शेअर्समध्ये HCL टेक, नेस्ले, NPC, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.82 लाख कोटींची वाढ

16 एप्रिल 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,94,25,823.46 कोटी होते. आज म्हणजेच 18 एप्रिल 2024 रोजी बाजार उघडताच ते 3,97,08,484.43 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,82,660.979 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

व्होडाफोन आयडियामध्ये 4 टक्के वाढ

गुरुवारी Vodafone Idea चे शेअर्स 4% पेक्षा जास्त वाढून 13.50 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ 18,000 कोटी रुपयांची एफपीओ उघडल्यानंतर झाली आहे. सध्या, शेअर 2.7% वाढून 13.30 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT