Share Market Closing  Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 20 September 2024: आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले आहे. बीएसई सेन्सेक्सने प्रथमच 84000 चा टप्पा ओलांडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला.

बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारातील ही वाढ दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी आजच्या व्यवहाराच्या शेवटी 1359 अंकांच्या वाढीसह 84,544 वर बंद केला आणि निफ्टी 375 अंकांच्या वाढीसह 25,790 वर बंद झाला.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्व क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, आयटी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आजच्या व्यवसायात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

Share Market Closing

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह तर 4 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 43 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE वर एकूण 4059 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यामध्ये 2442 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 1501 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 116 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

वाढत्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 5.57 टक्के, आयसीआयसीआय बँक 3.77 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 3.66 टक्के, एलअँडटी 3.07 टक्के, भारती एअरटेल 2.84 टक्के, नेस्ले 2.49 टक्के, अदानी पोर्ट्स 2.49 टक्के, एचयूएल 2.09 टक्के, एचडीएफसी 2.09 टक्के वाढीसह बंद झाले.

BSE SENSEX

घसरलेल्या शेअर्समध्ये एसबीआय 1.07 टक्क्यांच्या घसरणीसह, इंडसइंड बँक 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह, टीसीएस 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह आणि बजाज फायनान्स 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 6.5 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 20 सप्टेंबर रोजी वाढून 471.97 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी 465.47 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 6.5 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT