Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण, मिडकॅप निर्देशांक 1100 अंकांनी खाली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 7 October 2024: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी दिवसभर जोरदार विक्री झाल्यानंतर बेंचमार्क निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही बाजारात विक्रीचे वातावरण आहे. बाजाराची सुरुवात जोरदार झाली होती, मात्र त्यानंतर बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले.

शेवटी निफ्टी 218 अंकांनी घसरला आणि 24,795 वर बंद झाला. सेन्सेक्स 638 अंकांनी घसरून 81,050 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 983 अंकांनी घसरून 50,478 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण मिडकॅप निर्देशांकात झाली. निर्देशांक जवळपास 1200 अंकांनी घसरून बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकही 500 हून अधिक अंकांनी घसरला.

Share Market Closing

निफ्टी 50 वर सर्वात मोठी घसरण अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोल इंडिया आणि एसबीआयमध्ये झाली आहे. त्याच वेळी, M&M, ITC, ट्रेंट आणि भारती एअरटेलमध्ये वाढ झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग आणि ऊर्जा शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे. निफ्टी बँक 837 अंकांनी किंवा 1.63 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 2.52 टक्के किंवा 1050 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. निफ्टी मिडकॅप निर्देशांकही 1170 अंकांनी किंवा 2 टक्क्यांनी आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 495 अंकांनी किंवा 2.75 टक्क्यांनी घसरून बंद झाला. फक्त आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये थोडी तेजी दिसली.

Share Market Closing
गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारात चौफेर विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 452.20 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे गेल्या सत्रात 460.89 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.69 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 40 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

वाढत्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 1.46 टक्के, आयटीसी 1.40 टक्के, भारती एअरटेल 1.31 टक्के, इन्फोसिस 0.80 टक्के, बजाज फायनान्स 0.74 टक्के, टीसीएस 0.26 टक्के, टेक महिंद्रा 0.14 टक्के वाढीसह बंद झाले. तर अदानी पोर्ट्स 4.08 टक्के, एनटीपीसी 3.50 टक्के, एसबीआय 2.96 टक्के, पॉवर ग्रिड 2.92 टक्के, इंडसइंड बँक 2.43 टक्के घसरणीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT