Share Market Updates Sensex down 400pts Sakal
Share Market

Share Market Opening: होळीपूर्वी बाजार लाल! सेन्सेक्स 72,500च्या खाली; आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण

Sensex-Nifty Today: शुक्रवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 72,185 च्या पातळीवर गेला. निफ्टी देखील 22000 च्या महत्वाच्या पातळीच्या खाली व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 22 March 2024 (Marathi News): शुक्रवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 72,185 च्या पातळीवर गेला. निफ्टी देखील 22000 च्या महत्वाच्या पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. आयटी क्षेत्रामुळे शेअर बाजारावर दबाव आहे. तर बँकिंग क्षेत्र तेजीत आहे.

Share Market Opening

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण झाली होती, तर बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात भारती एअरटेल, सन फार्मा, सिप्ला, आयटीसी, बीपीसीएल आणि टायटन या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

BSE सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर 18 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक तेजीत सन फार्मा आहे जो 1.51 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय टायटन, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening

बीएसईच्या 2741 शेअर्समध्ये ट्रेडिंग होत असून 1742 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. 889 शेअर्समध्ये घसरण झाली असून 110 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 98 शेअर्समध्ये अपर सर्किट तर 45 शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसत आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्समध्ये वाढ आणि 20 शेअर्समध्ये घसरण होत आहे. निफ्टी बँक 32 अंकांनी वाढून 46,717 च्या पातळीवर पोहोचला असून 12 पैकी 10 शेअर्स वधारताना दिसत आहेत आणि फक्त 2 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत.

S&P BSE SENSEX

NSE निफ्टीच्या 2116 शेअर्समध्ये खरेदी-विक्री होत असून त्यापैकी 1356 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. 681 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 79 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 62 शेअर्समध्ये अपर सर्किट तर 31 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 21 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि 17 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.

आयटी शेअर्सवर दबाव

आयटी क्षेत्रावरील दबाव भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. निफ्टी आयटी निर्देशांकातील सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टेक कंपनी ऍक्सेंचरने महसूल कमी केल्यानंतर शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT