Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजारांसाठी, बुधवारी (10 जुलै) निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडून व्यवहार सुरू झाला. मात्र यानंतर बाजारात सपाट व्यवहार झाला. मात्र त्यानंतर बाजारात सातत्याने घसरण सुरू झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडला. मात्र यानंतर बाजारात सपाट व्यवहार झाला. विक्रमी पातळी गाठल्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकींग झाली. निफ्टी 100 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला.

निफ्टीने 24,461 चा नवा उच्चांक गाठला होता आणि सेन्सेक्सने 80,481 चा नवीन उच्चांक गाठला होता. पण निफ्टी 108 अंकांनी घसरून 24,324 वर बंद झाला तर सेन्सेक्स 426 अंकांनी घसरून 79,924 वर बंद झाला. निफ्टी बँक 379 अंकांनी घसरून 52,189 वर बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, टीसीएस आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज सर्वाधिक घसरले.

Share Market Closing

बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे दोन्ही क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. बाजाराने खालच्या स्तरावरून सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी BSE सेन्सेक्सला 426 अंकांचा धक्का बसला आणि तो 80,000 च्या खाली घसरला.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरने बाजार घसरण्यात मोठा हातभार लावला आहे, कंपनीचा शेअर 6.69 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. टाटा स्टील 2.07 टक्के, टीसीएस 1.85 टक्के, एचसीएल टेक 1.58 टक्के, एसबीआय 1.27 टक्के, टाटा मोटर्स 1.02 टक्के, इन्फोसिस 0.78 टक्के घसरून बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स 3.20 टक्के, एनटीपीसी 1.33 टक्के, पॉवर ग्रिड 1.29 टक्के, अदानी पोर्ट्स 0.71 टक्के, भारती एअरटेल 0.68 टक्के, सन फार्मा 0.53 टक्के वाढीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांना 1.18 लाख कोटी रुपयांचा फटका

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 10 जुलै रोजी 450.09 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार, 9 जुलै रोजी 451.27 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

BSE SENSEX

'या' 5 कारणांमुळे शेअर बाजार घसरला

1. नफा बुकिंगचा परिणाम

भारत आणि अमेरिकेतून चलनवाढीची आकडेवारी येण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आणि नफा बुक केला. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेअर बाजारातील अलीकडची वाढ पाहता अशी प्रॉफिट बुकिंग अपेक्षित होती. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील आजच्या एकूण घसरणीत या शेअर्सचा वाटा सुमारे 71 टक्के आहे.

2. F&O विभागावर सेबीची कठोरता

फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) विभागातील व्हॉल्यूम वाढ रोखण्याच्या सेबीच्या निर्णयामुळे आज बाजारात चिंतेचे वातावरण होते. सेबीच्या वर्किंग कमिटीने डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सचा लॉट आकार सध्याच्या 5 लाख रुपयांवरून 20-30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे जेणेकरून या विभागात प्रवेश करणे कठीण होईल.

3. व्याजदरातील कपातीबाबत अनिश्चितता

यूएस फेडरल रिझर्व्ह बँक या वर्षी व्याजदरात कपात करेल की नाही याबाबत अनिश्चितता वाढली आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की जोपर्यंत महागाई 2 टक्क्यांकडे जात आहे असा विश्वास मिळत नाही तोपर्यंत दर कमी करणे योग्य होणार नाही.

4. बँकिंग शेअर्सवर दबाव

आजच्या व्यवहारादरम्यान बँकिंग शेअर्सवरही दबाव होता, ज्यामुळे घसरणीला हातभार लागला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक दिवसापूर्वी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य वित्तीय अधिकारी आणि लेखापरीक्षकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत काही बँकांच्या लाखो खात्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली, ज्यांचा वापर फसवे व्यवहार आणि कर्जासाठी करण्यात आला.

5. जागतिक बाजारातील संकेत

जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकन शेअर बाजार तेजीसह उघडले. मात्र, आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. टोकियोच्या निक्केई 225 निर्देशांकाने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये नवीन उच्चांक गाठला, परंतु दुपारपर्यंत तो 0.1% घसरून 41,536.10 वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 0.4% वाढून 17,587.16 वर आला, तर शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.3% घसरून 2,949.60 वर आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT