Share Market Updates Sensex, Nifty down 1 percent at open; HDFC Bank down 5 percent  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 700 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 17 January 2024: जागतिक संकेत आणि HDFC बँकेचे खराब निकाल यामुळे शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. प्रमुख निर्देशांक 1-1 टक्क्यांनी घसरले आहेत. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 72,400 वर व्यवहार करत आहे.

निफ्टीही 200 अंकांनी घसरला आणि 21,800 च्या जवळ पोहोचला. खराब निकालामुळे HDFC बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आहेत. NSE वर बँक निफ्टी 2 टक्क्यांनी घसरला आहे.

बँकांच्या शेअर्समध्ये घसरण

मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद झाल्यानंतर HDFC बँकेने निकाल जाहीर केला. त्याचा परिणाम बुधवारी सकाळी बँकेच्या शेअरवर दिसून आला. बीएसई सेन्सेक्सवर बहुतांश बँकांचे शेअर्स खाली जात आहेत. यापैकी येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक यांचे शेअर्सही घसरले.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली. आज नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये बीपीसीएल, टाटा स्टील, टायटन या कंपन्यांचे शेअर्स आहेत.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएल टेक आणि विप्रोच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर एनटीपीसी आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये तेजी होती.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मल्टीबॅगर परतावा देणार्‍या कंपन्यांमध्ये नेस्ले इंडियासह ब्रँड कॉन्सेप्ट, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आणि पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स होते.

तर स्टोव्ह क्राफ्ट, ग्लोबस स्पिरिट, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, कामधेनू लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी इंटरनॅशनल, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, युनि पार्ट्स, एनएमडीसी लिमिटेड, जिओ फायनान्शियल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

आज जागतिक बाजारात घसरण

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन बाजारही घसरणीसह बंद झाले. मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 232 अंकांची घसरण झाली आणि तो 37,361.12 च्या पातळीवर बंद झाला.

NASDAQ Composite 28 अंकांनी घसरून 14,944.35 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक 18 अंकांनी घसरला आणि 4,765.98 च्या पातळीवर बंद झाला. अमेरिकेत 10 वर्षांच्या बाँडच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारावरही दबाव दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ticket Reservation : रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी; भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगची वेळ मर्यादा केली कमी,काय आहेत नवे नियम?

Latest Maharashtra News Updates : समीर वानखेडे आगामी विधानसभा निवडणूक धारावीतून लढणार नाहीत

IPL 2025 RETENTION RULES : ७५ कोटी, हवे तसे खर्च करा! SRH ने परफेक्ट कार्यक्रम केला, आता अन्य फ्रँचायझीचा ताप वाढला

Hingoli Assembly Election 2024 : बिगुल वाजताच...बॅनर, पोस्टर हटविले; आचारसंहिता लागू, प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची उडवली खिल्ली; त्यांनी पोस्ट केलेला Video पाहून चाहते खवळले

SCROLL FOR NEXT