Share Market Updates Sensex, Nifty down at open as global peers drag; KMB shares down  Sakal
Share Market

Share Market Opening: 4 दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: शेअर बाजारात गुरुवारी सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला. सकाळी बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी घसरला आणि 73,600 च्या जवळ आला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 25 April 2024 (Marathi News): शेअर बाजारात गुरुवारी सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला. सकाळी बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी घसरला आणि 73,600 च्या जवळ आला. निफ्टीही 60 अंकांनी घसरला आणि 22,350च्या खाली आला.

बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग क्षेत्रात होत आहे. निफ्टीमध्ये कोटक बँकेचा शेअर सर्वाधिक 9% घसरला आहे, तर मजबूत निकालांमुळे ॲक्सिस बँकेने 3% झेप घेतली आहे.

Sensex Today

कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातल्यानंतर बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक घसरून 1,673 रुपयांवर आले. हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरले आहेत.

Nifty Today

आज 'या' कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल

आज बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, शेफलर इंडिया, एसीसी, एमफेसिस, कोरोमंडल इंटरनॅशनल, लॉरस लॅब्स, सायएंट, जय बालाजी इंडस्ट्रीज, हिमाद्री स्पेशालिटी केमिकल, टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र), ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, ऑलेक्ट्रा लिव्हिंग Zensar Technologies आणि Tanla Platform सह इतर अनेक कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षित आहेत.

S&P BSE SENSEX

मेटा शेअर्स घसरले

अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्ये घसरणीची नोंद झाली आहे. मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकेत महागाईचा अहवाल येणार असून, त्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत तर देशी गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. निफ्टी आणि बँक निफ्टीवर तेजीची भावना कायम असली तरी व्यापारी कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर लक्ष ठेवून आहेत.

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फोसिसचे शेअर्स तेजीत होते.

तर विप्रो, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, लार्सन, एशियन पेंट्सचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या 10 पैकी पाच कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते तर पाच कंपन्यांचे शेअर्स घसरल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT