Share Market Updates Sensex, Nifty down at opening bell, led by weak signals from Asian peers  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण, सोन्याचा भाव नवीन उच्चांकावर

Sensex-Nifty Today: शेअर बाजार बुधवारी घसरणीसह उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत. कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला आहे. यात तैवानमधील भूकंप, रोखे उत्पन्नात झालेली वाढ आणि इतर घटकांचा समावेश आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 3 April 2024 (Marathi News):

शेअर बाजार बुधवारी घसरणीसह उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत. कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला आहे. यात तैवानमधील भूकंप, रोखे उत्पन्नात झालेली वाढ आणि इतर घटकांचा समावेश आहे.

याशिवाय आजपासून सुरू होणाऱ्या आरबीआय एमपीसी धोरणाकडेही बाजाराची नजर आहे. सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी घसरून 73,600 वर तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी घसरून 22,400 च्या खाली आला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

Share Market Opening

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ होत होती.

Share Market Opening

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 17 शेअर्समध्ये घसरण आणि 13 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा 1.48 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट 1.39 टक्क्यांनी वर आहे. ॲक्सिस बँक 1.10 टक्के आणि टाटा स्टील 0.52 टक्क्यांनी वर आहे. बजाज फायनान्स 0.31 टक्क्यांच्या वाढीसह आणि एचसीएल टेक 0.18 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

S&P BSE SENSEX

निफ्टीचे कोणते शेअर्स तेजीत?

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त 12 शेअर्समध्ये वाढ आणि 38 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या टॉप गेनर्सपैकी हिंदाल्को 1.79 टक्क्यांनी आणि श्री राम फायनान्स 1.54 टक्क्यांनी वर आहे. अल्ट्राटेक सिमेंट 1.33 टक्के आणि ओएनजीसी 1.10 टक्क्यांनी वर आहे. ॲक्सिस बँक एक टक्का वाढीसह व्यवहार करत आहे.

अदानी कंपन्यांचे शेअर्स

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या 10 पैकी तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी पॉवर सुमारे चार टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर एसीसी लिमिटेड एक टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

अमेरिकन शेअर बाजारातील विक्रीमुळे आशियाई शेअर बाजारातही विक्री वाढल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील ट्रेझरी बॉण्डचे उत्पन्न वाढल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे टाळत आहेत.

अमेरिकेतील ट्रेझरी उत्पन्न गेल्या वर्षी डिसेंबरपासून 4.4 टक्क्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीने 5 महिन्यांतील उच्चांक गाठल्याने शेअर बाजारातील चिंताही वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT