Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; बँकिंग-आयटीच्या शेअर्समध्ये विक्री

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 29 December 2023: जागतिक आणि देशांतर्गत संमिश्र संकेतांमुळे शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात थोड्या घसरणीने झाली. सेन्सेक्स 180 अंकांनी घसरला आणि 72,220 च्या जवळ आला. निफ्टीही 60 अंकांच्या घसरणीसह 21,700 च्या जवळ व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 14 शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि 16 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे आणि मारुतीमध्ये 0.63 टक्के वाढ दिसून येत आहे. बजाज फिनसर्व्ह 0.59 टक्क्यांनी तर सन फार्मा 0.55 टक्क्यांनी वर आहे. HUL मध्ये 0.51 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ झाली, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकमध्ये घसरण झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात कोल इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकार्ड आणि एनटीपीसी सारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्सचे शेअर्स आहेत.

शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये अस्निशा इंडस्ट्रीज, जेनसोल इंजिनिअरिंग आणि हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली, तर ओम इन्फ्रा, इंडियन ऑइल आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

शेअर बाजारात एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, पटेल इंजिनीअरिंग आणि स्टोव्ह क्राफ्टच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर जिओ फायनान्शियल, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी इंटरनॅशनल, युनि पार्ट्स इंडिया, ब्रँड यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT