Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; सेन्सेक्स 73,500च्या पुढे, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: मंगळवारी देशांतर्गत बाजारातील व्यवहार वाढीसह सुरू झाले आहेत. बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करताना दिसले. एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मॅरिको, गोदरेज कंझ्युमर, ब्रिटानिया, एचयूएल या शेअर्सनी सर्वाधिक वाढ नोंदवली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 7 May 2024 (Marathi News): मंगळवारी देशांतर्गत बाजारातील व्यवहार वाढीसह सुरू झाले आहेत. बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करताना दिसले. एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मॅरिको, गोदरेज कंझ्युमर, ब्रिटानिया, एचयूएल या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय बीपीसीएल आणि टायटनही तेजीत आहेत. जवळपास 100 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 74,000च्या आसपास उघडला. निफ्टी 22,400च्या वर व्यवहार करत आहे.

Sensex Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण झाली होती. तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकात वाढ झाली. रिझर्व्ह बँकेने पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठ्याशी संबंधित नवीन नियमांमुळे सोमवारी शेअर बाजारात चिंतेचे वातावरण होते.

Nifty Today

कोणते शेअर्स तेजीत?

BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 11 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे तर 19 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. एफएमसीजी क्षेत्राचे शेअर्स वाढले आहेत आणि एचयूएल 2.61 टक्क्यांनी वाढून टॉप गेनर आहे. नेस्ले 1.82 टक्के आणि आयटीसी 1.50 टक्क्यांनी वर आहे. एशियन पेंट्स, विप्रो, एसबीआय आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही तेजीत आहेत, तर टेक महिंद्रा, एल अँड टी, टीसीएस, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्सही तेजीत आहेत.

S&P BSE SENSEX

निफ्टीचे कोणते शेअर्स वाढले?

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये वाढ तर 23 शेअर्स घसरत आहेत. आज निफ्टी जवळपास 22,500 च्या पातळीवर पोहोचला होता आणि दिवसाचा उच्चांक 22,499.05 वर होता. FMCG शेअर्स निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये चमकत आहेत आणि HUL 3.13 टक्क्यांनी वाढला आहे. नेस्ले 2.02 टक्के आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज 1.99 टक्के वाढले आहेत. आयटीसी 1.77 टक्के आणि कोल इंडिया 1.65 टक्क्यांनी वर आहे.

BSEचे मार्केट कॅपिटलायझेशन

एकूण 2975 शेअर्सचे व्यवहार होत असताना BSE चे बाजार भांडवल 403.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापैकी 1347 शेअर्स वर तर 1518 शेअर्स खाली आहेत. 88 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 56 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT