Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: जागतिक बाजारातील तेजीनंतर गुरुवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह उघडला. आयटी शेअर्सने ताकद दाखवली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 16 May 2024: जागतिक बाजारातील तेजीनंतर गुरुवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह उघडला. आयटी शेअर्सने ताकद दाखवली.

भारती एअरटेल आजही टॉप गेनर्सपैकी एक आहे. व्यवहाराच्या सुरूवातीस, सेन्सेक्स सुमारे 330 अंकांच्या वाढीसह 73,300 च्या वर उघडला. निफ्टी 95 अंकांच्या वाढीसह 22,300 च्या आसपास तर निफ्टी बँक 245 अंकांच्या वाढीसह 47,932 च्या आसपास उघडला.

Share Market Today

अमेरिकेत व्याजदर कपातीचे संकेत

अमेरिकेतील एप्रिलच्या महागाईच्या आकडेवारीवरून फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते, त्यामुळे निफ्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत व्याजदर कपातीची अपेक्षा आणि कंपन्यांच्या कमाईचे चांगले परिणाम हे देखील बाजारातील वाढीचे कारण आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवत आहेत.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी स्मॉल कॅप यांसारख्या निर्देशांकांची वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एलटीआय माइंड ट्री, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस आणि हिरो मोटोकॉर्प यांचे शेअर्स होते.

Share Market Today

तर ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली त्यात मारुती, कोल इंडिया, टाटा मोटर्स, एनटीपीसी, सिप्ला आणि डिव्हीज लॅबचा समावेश होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी ओएनजीसी, इंजिनिअर्स इंडिया, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वधारले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.83 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 15 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,04,25,303.21 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 16 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,06,08,542.81 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,83,239.6 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आज BSE वर 2381 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1807 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 468 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 106 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 69 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 12 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 86 शेअर्स वरच्या सर्किटवर पोहोचले, तर 29 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT