Sensex opens Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; मेटल आणि बँकिंग क्षेत्राचा दबाव; कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: मंगळवारी शेअर बाजारात किंचीत वाढ दिसून आली. सकारात्मक सुरुवातीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक सेन्सेक्स 71,970 वर उघडला आणि 71,805 च्या जवळ आला. निफ्टीही 21,780 च्या पातळीवर सपाट व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 6 February 2024: मंगळवारी शेअर बाजारात किंचीत वाढ दिसून आली. सकारात्मक सुरुवातीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक सेन्सेक्स 71,970 वर उघडला आणि 71,805 च्या जवळ आला. निफ्टीही 21,780 च्या पातळीवर सपाट व्यवहार करत आहे.

चांगल्या निकालांमुळे, भारती एअरटेलचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला आहे. एकूणच बाजारात सर्वाधिक खरेदी ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात होत आहे, तर विक्री मेटल आणि बँकिंग क्षेत्रात होत आहे.

कोणते शेअर्स वाढले?

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ झाली तर निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होता. टाटा मोटर्स, कोल इंडिया, सन फार्मा आणि सिप्ला यांचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात वाढले.

शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात

कोणते शेअर्स वाढले?

पॉवर ग्रिड, एनटीपीसी, हिंदाल्को, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील आणि कोटक बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारात वाढ होणाऱ्या कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज, विप्रो, एचसीएल टेक, बीपीसीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचाही समावेश होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजावर देशांतर्गत घडामोडींचे वर्चस्व असणार आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घसरण आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे सोमवारी दुपारी व्यवहारावर बराच परिणाम झाला.

पेटीएम शेअर्समध्ये तेजी

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स मंगळवारी तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत. बँक रेग्युलेटर आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केल्यानंतर शेअर प्रथमच तेजीत दिसत आहे.

31 जानेवारी रोजी झालेल्या कारवाईनंतर, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे 20%, 20% आणि 10% चे 3 लोअर सर्किट लागू करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी शेअरमध्ये रिकव्हरी दिसून येत आहे. पेटीएम शेअरचा इंट्राडे उच्चांक 443.85 रुपयांवर पोहोचला आहे.

निफ्टी शेअर्सची स्थिती

निफ्टी शेअर्सवर नजर टाकली तर त्यातील 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढताना दिसत आहेत तर 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत. शेअर बाजारात आज निफ्टीमध्ये आयटी शेअर्सचे वर्चस्व दिसून येत असून टॉप 3 शेअर्स फक्त आयटीचे आहेत. त्यामध्ये TCS 3.6 टक्के, एचसीएल टेक 2.83 टक्के आणि विप्रो 2.57 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT