Share Market Opening Latest Update 12 August 2024: हिंडेनबर्ग अहवालाच्या भीतीने सोमवारी (12 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी अर्ध्या टक्क्यांनी खाली आले आहेत. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी घसरला होता. त्याच वेळी निफ्टी 24,300 च्या आसपास व्यवहार करत होता.
सेन्सेक्स 375 अंकांनी घसरला आणि 79,330 वर उघडला. निफ्टी 47 अंकांनी घसरून 24,320 वर उघडला. बँक निफ्टी 72 अंकांनी घसरून 50,412 वर उघडला.
गेल्या आठवड्याच्या शेवटी हिंडेनबर्ग अहवालात सेबीच्या प्रमुखांवरील आरोपांचा परिणाम बाजारात दिसून येत आहे, परंतु जितकी भीती वाटत होती तितका शेअर बाजार घसरला नाही. मात्र, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
BSE सेन्सेक्समध्ये 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स घसरत आहेत आणि 8 शेअर्स वधारत आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर आज अदानी शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पोर्ट्स 1.84 टक्क्यांनी घसरत आहे. पॉवरग्रिड आणि एसबीआयचे शेअर्सही घसरले आहेत. टाटा मोटर्सची चांगली कामगिरी सुरूच आहे.
9 ऑगस्ट 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,50,21,816.11 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 12 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,47,95,249.00 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,26,567.11 कोटी रुपयांची घट झाली आहे.
आज BSE वर 2942 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1180 शेअर्स तेजीत दिसत आहेत. 1556 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 206 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 104 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 15 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 115 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 80 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.