Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार सावध

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 26 July 2024: भारतीय शेअर बाजार आज तेजीसह सुरु झाला आहे. सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स 119 अंकांनी वधारला आणि 80,158 वर उघडला. निफ्टी 17 अंकांनी वाढून 24,423 वर तर निफ्टी बँक 432 अंकांनी घसरून 50,456 वर उघडला.

सकाळी, GIFT निफ्टी सुमारे 50 अंकांनी वर होता आणि 24500 च्या जवळ होता, तर Dow Futures सुमारे 100 अंकांनी वर होता. निक्की 125 अंकांनी वधारला होता. काल अमेरिकन बाजारांमध्ये थोडी रिकव्हरी होती.

Share Market Opening

अर्थसंकल्पानंतर, बाजारात घसरण सुरु आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसांत वरच्या स्तरावरून निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव असू शकतो. पुढील 1-2 ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी फ्लॅट राहण्याची अपेक्षा आहे.

नकारात्मक बाजूने, निफ्टीला 24100-24000 पातळीच्या आसपास महत्त्वाचा खालचा आधार आहे. 24000 च्या खाली गेल्यास निफ्टीमध्ये मोठी विक्री होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.

Share Market Opening

बँक निफ्टीमध्ये घसरण

कालही बँक निफ्टीमध्ये घसरण झाली होती जी आजही कायम आहे. बँक निफ्टी 169.75 अंक किंवा 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 50,719 वर आहे. 12 शेअर्सपैकी 6 शेअर्स वाढत आहेत आणि 6 शेअर्स घसरत आहेत.

फेडरल बँक सर्वात जास्त 3.56 टक्क्यांनी आणि आयडीएफसी फर्स्ट बँक 1.71 टक्क्यांनी घसरली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 10 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्सचा टॉप गेनर भारती एअरटेल आहे आणि तो 2.25 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा स्टील आजही वर आहे आणि 1.97 टक्के वाढ दाखवत आहे.

याशिवाय इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, टीसीएस, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, पॉवरग्रीड, एसबीआय, अदानी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एमअँडएम, बजाज फिनसर्व्ह यांसारख्या शेअर्समध्ये वाढ होत आहे.

BSE चे मार्केट कॅपिटलायझेशन

BSE वर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 453.15 लाख कोटी रुपये झाले आहे. अमेरिकन चलनात ते 5.41 ट्रिलियन यूएस डॉलर आहे. बीएसईवर 3191 शेअर्सची खरेदी-विक्री होत आहे, त्यापैकी 2326 शेअर्स वाढले आहेत.

766 शेअर्समध्ये घसरण झाली आहे आणि 99 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. 162 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 34 शेअर्सवर लोअर सर्किट आहे. 171 शेअर्स एक वर्षाच्या उच्चांकावर आहेत तर 11 शेअर्स नीचांकी पातळीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT