Share Market Opening Latest Update 19 March 2024 (Marathi News): बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 72200 आणि निफ्टी 22900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे.
आज बाजारात ऑटो, मेटल, आयटी आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी होत आहे. तर कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रात विक्री होत आहे. निफ्टीमध्ये आयशर मोटरचा शेअर 5 टक्क्यांच्या उसळीसह सर्वाधिक वाढला आहे.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये आयशर मोटर्स, बीपीसीएल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर ज्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली त्यामध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, HDFC Life, Britannia. HUL, Dr Reddy's, Titan आणि HDFC बँकेचे शेअर्स होते.
सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 24 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. मारुती, एनटीपीसी आणि टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, HUL, Titan आणि ICCI बँकेत आज सर्वात मोठी घसरण झाली.
अमेरिकेत महागाई वाढीचा आकडा पुन्हा डोके वर काढू लागला आहे, त्यामुळे अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची योजना पुढे ढकलण्याची भीती शेअर बाजारातील व्यापाऱ्यांना वाटत आहे.
बुधवारी सकाळी आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय दिसून आला. भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह यामुळे मंगळवारी गुंतवणूकदार सावध आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि वॉल स्ट्रीटच्या चांगल्या कामगिरीमुळे बुधवारी सकाळी शेअर बाजार वाढीसह उघडला.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी अल्पावधीत तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, त्याला 21560 अंकांच्या पातळीवर भक्कम पाठिंबा आहे, निफ्टी अल्पावधीत 22050 ची पातळी गाठू शकतो.
झोमॅटो: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने शाकाहारी जेवणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. यामध्ये शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेले जेवणच डिलिव्हरी केले जाईल. कंपनी येत्या काही आठवड्यात विशेष केक डिलिव्हरी आणणार आहे.
पतंजली फूड: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंजली आयुर्वेदावरील अहवालांवर कंपनीने स्पष्टीकरण दिले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पतंजली आयुर्वेदाच्या आयुर्वेदिक उत्पादने आणि औषधांच्या जाहिरातींशी संबंधित आहे, पतंजली फूड्सवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पतंजली फूड्स ही FMCG विभागामध्ये कार्यरत असलेली एक लिस्ट असलेली कंपनी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.