Sumitomo Chemical sakal
Share Market

Share Market Update : सुमितोमो केमिकलच्या शेअर्समध्ये तेजी;चौथ्या तिमाही निकालांचा दमदार परिणाम

सुमितोमो केमिकल इंडियाच्या (Sumitomo Chemical) शेअर्समध्ये सध्या चांगली ऍक्शन पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुमितोमो केमिकल इंडियाच्या (Sumitomo Chemical) शेअर्समध्ये सध्या चांगली ऍक्शन पाहायला मिळत आहे. त्याचे शेअर्स नुकतेच 9 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या हा शेअर बीएसईवर 2.48 टक्क्यांच्या वाढीसह 451.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, शेअरने इंट्राडेमध्ये 482 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. खरं तर, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत मजबूत निकाल जारी केले आहेत. यामुळेच कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. या वाढीसह, कंपनीचे मार्केट कॅप 22,551 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 336.40 रुपये आहे.

सुमितोमो केमिकलच्या नफ्यात जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक 52% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीला 110 कोटीचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 652 कोटीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 3 टक्क्यांनी वाढून 674 कोटी झाला आहे. ग्रॉस प्रॉफिट मार्जिनमध्ये (GPM) सुधारणा आणि ऑपरेटिंग खर्चात कमी वाढ झाल्यामुळे EBITDA वार्षिक 74 टक्क्यांनी वाढून 140 कोटी झाला. एबिटा मार्जिन मागील वर्षाच्या तिमाहीत 12.4% च्या तुलनेत 20.8% वर सुधारला आहे.

कंपनी मजबूत देशांतर्गत आणि क्षमतेची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन सुविधा अपग्रेड आणि क्षमता विस्तारासाठी दरवर्षी एकत्रित EBITDA च्या 15 टक्के गुंतवणूक करते असे कंपनीने सांगितले. सुमितोमो केमिकलने दोन अतिरिक्त लँड पार्सल खरेदी करण्यासाठी करार केला आहे आणि ट्रान्सफर प्रोसेस लवकरच पूर्ण होण्याची आशा आहे.

सुमितोमो केमिकल इंडियाचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 13 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 18 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 12 टक्के नफा कमावला आहे. याशिवाय गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 94 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT