Startup OYO to refile for IPO post refinancing it may submit DRHP to SEBI report  Sakal
Share Market

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

OYO IPO: सॉफ्ट बँकने गुंतवणूक केलेली हॉस्पिटॅलिटी कंपनी ओयो (OYO) लवकरच त्याच्या आयपीओसाठी पुन्हा कागदपत्रे (DRHP) सादर करू शकते. याआधीही या स्टार्टअपने आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती

राहुल शेळके

OYO IPO: सॉफ्ट बँकने गुंतवणूक केलेली हॉस्पिटॅलिटी कंपनी ओयो (OYO) लवकरच त्याच्या आयपीओसाठी पुन्हा कागदपत्रे (DRHP) सादर करू शकते. याआधीही या स्टार्टअपने आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती, पण त्यावेळी सेबीने मान्यता दिली नव्हती. पीटीआयच्या अहवालानुसार, ओयो आपली रीफायनान्सिंग प्लॅन पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. हे पूर्ण होताच कंपनी आयपीओसाठी कागदपत्रे दाखल करेल.

ओयो 450 मिलियन डॉलर बाँडच्या विक्रीतून उभारण्याची योजना आखत आहे. यासह कंपनी आपला रीफायनान्सिंग प्लॅन पूर्ण करेल. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, जेपी मॉर्गन या प्रक्रियेतील आघाडीची बँक असू शकते.

ओयोने याआधी सप्टेंबर 2021 मध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता. पण, तेव्हा हॉस्पिटॅलिटी युनिकॉर्न ओयोला बाजार नियामक सेबीकडून मोठा झटका बसला होता. सेबीने कंपनीचा पब्लिक इश्यू अर्ज फेटाळला होता. अर्ज अपडेट करून पुन्हा दाखल करावेत, असे बाजार नियामकाने सांगितले होते.

सेबीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ओयोने पब्लिक इश्यूद्वारे 8,430 कोटी उभारण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी 7000 कोटीचे नवीन शेअर्स जारी करण्याची योजना होती, तर ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसमधून 1430 कोटी उभारण्याची योजना होती.

कंपनीच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), सेबीने 30 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे आयपीओ कागदपत्रे परत केली होती. तसेच अपडेशनसह पुन्हा दाखल करण्यास सांगितले. तेव्हापासून, कंपनी आपली परिस्थिती सुधारण्यात गुंतली होती आणि आता लवकरच ती पुन्हा सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची तयारी करत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: 4 लाख कोटींचे नुकसान... ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष ओसरला; सेन्सेक्स 900हून अधिक अंकांनी कोसळला

Ratnagiri Election : निष्ठावंत शिवसैनिकाने घेतली माघार; ठाकरे गटाला मिळाली मोठी ताकद, मुस्लिम बांधवही देणार साथ!

Article 370 मागे घेण्यावरून विधानसभेत राडा, आधी बाचाबाची नंतर आमदारांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

नातेवाईक ६ नंबर म्हणायचे... प्रणित हाटेने सांगितला बालपणीचा कटू अनुभव; काकाने साडी नेसताना पकडलं आणि

Gold Price: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे सोन्याचे भाव कोसळणार; किती घसरण होणार?

SCROLL FOR NEXT