Stock Market Crash after starting on green mark sensex plunges more than 700 points  Sakal
Share Market

Stock Market Crash: शेअर बाजार अचानक कोसळला, सेन्सेक्स उच्चांकावरून 1,000 अंकांनी खाली

Stock Market Crash: तेजीसह सुरुवात केल्यानंतर दुपारच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

राहुल शेळके

Stock Market Crash: सकाळी मोठ्या तेजीसह सुरुवात केल्यानंतर दुपारच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजार सपाट झाला आहे.

निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 1300 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास 500 अंकांनी घसरला आहे. बाजारातील घसरणीच्या या वादळात इतर क्षेत्रातील शेअर्सचे नुकसान झाले आहे.

शेअर बाजारातील वाढीदरम्यान, सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यापारात जवळपास 450 अंकांची वाढ केली होती आणि 71,913 च्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता आणि सध्या त्याच्या उच्चांकावरून 1,000 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यापार करत आहे.

निफ्टीचीही अशीच स्थिती होती आणि बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात तो 21,593 चा स्तर गाठला होता, जी त्याची 52 आठवड्यांची उच्च पातळी होती, तर बातमी लिहिपर्यंत निफ्टी-50 दिवसाच्या उच्च पातळीपासून 370 अंकांनी घसरला होता.

BSE वर 30 पैकी 29 शेअर्स घसरले

BSEच्या 30 पैकी 29 शेअर्स घसरले होते, तर फक्त एका शेअर्समध्ये (HDFC बँक शेअर) किंचित वाढ होताना दिसत होती. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीदरम्यान, एनटीपीसीचा शेअर 2.92 टक्क्यांनी घसरून 300.75 रुपयांच्या पातळीवर, एचसीएलटेकचा शेअर 2.97 टक्क्यांनी घसरून 1443.90 रुपयांच्या पातळीवर आला.

M&Mचा शेअर 3.20 टक्क्यांनी घसरून 1645.50 रुपयांवर, TAMOTORSचा शेअर 3.20 टक्क्यांनी घसरला. तर टाटा स्टीलचा शेअर 3.40 टक्क्यांनी घसरून 130.80 रुपयांवर आला.

गुंतवणूकदारांना 9.32 लाख कोटींचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 19 डिसेंबर रोजी 349.79 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार 19 डिसेंबर रोजी 359.11 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 9.32 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 9.32 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT