Stock Market Crash Sakal
Share Market

Stock Market Crash: कोसळलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? कसा आहे बाजाराचा इतिहास?

राहुल शेळके

Stock Market Crash: युद्धासारखी प्रतिकूल परिस्थिती दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देऊ शकते. गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडत्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त दरात खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. पण धोका पत्करण्याची क्षमता असायला हवी, असे विश्लेषकांचे मत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, असे दिसून आले आहे की भू-राजकीय जोखमीच्या वेळी इक्विटी बाजार अधिक वेगाने प्रतिक्रिया देतात, परंतु लवकरच पुन्हा स्थिर होतात.

युद्धादरम्यान S&P 500 कामगिरी

उदाहरणार्थ, 1990 मध्ये कुवेतवर इराणने हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान बाजारात मोठी घसरण झाली होती आणि कच्च्या तेलाच्या किमती त्या वेळी दुप्पट झाल्या होत्या. मात्र, चार महिन्यांतच शेअर बाजार पुन्हा उच्चांकी पातळीवर पोहोचले.

S&P 500

भारतातही 1999 च्या मध्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धादरम्यान बाजारात मोठी घसरण दिसून आली. हे युद्ध जास्त काळ टिकणार नाही हे स्पष्ट झाल्यावर बाजारांनी वेगाने पुनरागमन केले.

युद्धादरम्यान निफ्टीची कामगिरी

पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गेल्या काही व्यापार सत्रांमध्ये भारतासह जागतिक बाजारपेठांवर दबाव होता. यामुळे ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 5% वाढली आणि ती प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास पोहोचली.

Nifty 50
युद्धादरम्यान गुंतवणूक करावी का? विश्लेषक काय सांगतात?

बाजार विश्लेषक अंबरिश बालिगा यांच्या मते, 'युद्धासारख्या घटना दीर्घकालीन गुंतवणूकदारांना खरेदीच्या संधी देतात. परंतु हा सुरू असलेला संघर्ष थोड्या काळासाठी म्हणजे तात्पुरता आहे की परिस्थिती आणखी बिघडणार आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धादरम्यानही बाजारात सुरुवातीची घसरण होती.

पण, जेव्हा गुंतवणूकदारांना समजले की घटना स्थानिक पातळीवर मर्यादित राहतील, तेव्हा बाजार लवकरच सावरला. आता तरी हे युद्ध स्थानिक पातळीवरच मर्यादित राहणार की जागतिक रुप घेणार, याची चिंता गुंतवणूकदारांना अधिक आहे. परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास येत्या काही दिवसांत बाजारात पुन्हा तेजी दिसू शकते.

आगामी काही आठवडे बाजारासाठी आव्हानात्मक असू शकतात. कारण विधानसभा निवडणुकांचे निकाल, सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल (Q2-FY25), रिझर्व्ह बँकेचे आर्थिक धोरण (RBI मॉनेटरी पॉलिसी) आणि जागतिक स्तरावर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आणि कच्च्या तेलाच्या किमती यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

Pune Crime : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून पित्याला अटक

Narendra Modi ५ ऑक्टोबरला ठाणे दौऱ्यावर, वाहतुकीत मोठे बदल, महत्त्वाचे रस्ते बंद, 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SSC Exam : दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT