Social Media Reaction on Stock Market Sakal
Share Market

Social Media Reaction: निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजार कोसळला; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

राहुल शेळके

Social Media Reaction on Stock Market: 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचे निकाल चुकीचे सिद्ध झाल्यामुळे मंगळवार हा भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत अशुभ दिवस होता. आज शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष भाजपला लोकसभा निवडणुकीत एकतर्फी बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात मोठी निराशा झाली आणि आज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

4 जून 2024 रोजी व्यापार संपेपर्यंत, BSE सेन्सेक्स 4389.73 अंकांनी घसरला आणि 72,079 वर बंद झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1379.40 अंकांच्या घसरणीसह 21,884.50 वर बंद झाला.

सोशल मीडियावर मीम्सचा पूर

मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. स्टॉक मार्केट क्रॅशनंतर अनेक लोकांनी मजेदार मीम्स शेअर केले. एक्झिट पोलच्या आधारे ज्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले होते त्यांची लोकांनी खिल्ली उडवली आहे.

सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण

आज एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये जबरदस्त विक्री झाली आहे. PSU बँक आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 12.47 टक्के किंवा 5357 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये आज 7.95 टक्के किंवा 4051 अंकांची घसरण दिसून आली आहे. याशिवाय आज तेल आणि गॅस, मेटल, ऑटो, आयटी, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले

शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या मोठ्या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, BSE वर शेअर्सचे मार्केट कॅप रु. 426 लाख कोटी होते, जे आज 395.42 लाख कोटींवर आले आहे. गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

Pune Crime: पुण्यामध्ये राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 66 लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT