Stock Market Holiday: या आठवड्यात शेअर बाजार आणखी एक दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीनंतर, दिवाळी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर, आज मंगळवारी 14 नोव्हेंबर 2023 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीवर शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.
नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजाराला दोन दिवस सुट्ट्या आहेत - 14 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा आणि दुसरी 27 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त. या वर्षातील सुट्ट्यांवर नजर टाकली तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक तीन सुट्ट्या होत्या.
आता हे वर्ष संपायला जेमतेम दीड महिना उरला आहे. या काळात शेअर बाजारात आणखी एक सुट्टी असणार आहे, ती म्हणजे ख्रिसमस. 25 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजार बंद असणार आहे.
सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली आणि BSE सेन्सेक्स 325 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 325.58 अंकांनी घसरून 64,933.87 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 406.09 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 82 अंकांनी घसरून 19,443.55 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात घसरण का होत आहे?
तज्ज्ञांच्या मते, दिवाळीनंतर जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात सुधारणा झाली. पण औद्योगिक उत्पादनातील घट (IIP) आणि जागतिक व्याज दरात होणारी वाढ आणि महागाई या घटकांचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.
काल गुंतवणूकदारांचे 40,000 कोटी रुपयांचे नुकसान
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल काल 13 नोव्हेंबर रोजी 3,22,07 लाख कोटी रुपयांवर होते, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी 3,22,48 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत काल सुमारे 40,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.