Stock Market Holiday Sakal
Share Market

Stock Market Holiday: आज BSE-NSE वर कोणताही व्यवहार होणार नाही; जाणून घ्या बाजार कधी उघडतील?

Stock Market Holiday, 2nd October: आज बुधवारी (2 ऑक्टोबर 2024) भारतीय शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. आज गांधी जयंतीनिमित्त देशभरात सुट्टी असल्याने बाजारपेठा आज व्यवसायासाठी खुल्या राहणार नाहीत.

राहुल शेळके

Stock Market Holiday, 2nd October: आज बुधवारी (2 ऑक्टोबर 2024) भारतीय शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. आज गांधी जयंतीनिमित्त देशभरात सुट्टी असल्याने बाजारपेठा आज व्यवसायासाठी खुल्या राहणार नाहीत. या कारणास्तव नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) व्यापारासाठी बंद राहतील.

आज, केवळ इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि सिक्युरिटी ट्रेडिंगच बंद राहणार नाही, तर दोन्ही सत्रांसाठी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. गुरुवार 3 ऑक्टोबरला बाजार उघडतील.

शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी

  • 1 नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी

  • 15 नोव्हेंबर (शुक्रवार)- गुरु नानक जयंती

  • 25 डिसेंबर (बुधवार) - ख्रिसमस

MCX सुट्ट्या:

  • 1 नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी – पहिले सत्र बंद राहील.

  • 15 नोव्हेंबर (शुक्रवार) – गुरु नानक जयंती – पहिले सत्र बंद राहील.

  • 25 डिसेंबर (बुधवार) - ख्रिसमस

काल शेअर बाजार कसा होता?

स्थानिक शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरण झाली. ऑइल आणि गॅस आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे सेन्सेक्सला 33.49 अंकांचे किंचित नुकसान झाले.

बीएसईचा 30 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 33.49 अंकांच्या किंवा 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 84,266.29 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान, तो 84,648.40 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील 13.95 अंकांच्या किंवा 0.05 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 25,796.90 अंकांवर बंद झाला.

विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरणीचा कल आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेतल्याने शेअर बाजारातील घसरणीचे हे सलग तिसरे सत्र ठरले.

या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्सने एकूण 1,570 अंक किंवा सुमारे दोन टक्के आणि निफ्टीने 419 अंक किंवा 1.6 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. चीनमधील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर भारतीय बाजारात घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT