Stock Market holidays in 2024 BSE, NSE will be closed on these days Sakal
Share Market

Stock Market Holiday: नव्या वर्षात शेअर बाजार किती दिवस राहणार बंद? पाहा सुट्ट्यांची यादी

Stock Market Holidays 2024: नवीन वर्षात 2024 मध्ये स्टॉक एक्सचेंज एनएसएई आणि बीएसईला 14 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. म्हणजेच सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार आहे. प्रजासत्ताक दिन असल्यामुळे 26 जानेवारीला बाजार बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन सुट्ट्या मार्चमध्ये असतील.

राहुल शेळके

Stock Market Holidays 2024: नवीन वर्षात 2024 मध्ये स्टॉक एक्सचेंज एनएसएई आणि बीएसईला 14 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. म्हणजेच सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार आहे.

प्रजासत्ताक दिन असल्यामुळे 26 जानेवारीला बाजार बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन सुट्ट्या मार्चमध्ये असतील. यामध्ये 8 मार्चला (शुक्रवार) महाशिवरात्री, 25 मार्चला (सोमवार) होळी आणि 29 मार्चला गुड फ्रायडे आहे.

एप्रिल, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी दोन दिवस बाजार बंद असेल. फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये बाजाराला सुट्ट्या नसतील. ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि रामनवमी 11 एप्रिल (गुरुवार) आणि 17 एप्रिल (बुधवार) रोजी असेल.

तर महाराष्ट्र दिन 1 मे (बुधवार). 17 जून (सोमवार) रोजी बकरी ईद निमित्त बाजार बंद असेल. 17 जुलैला मोहरम साजरा होणार आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन , महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर) निमित्त बाजार बंद राहील.

दिवाळी निमित्त 1 नोव्हेंबरला बाजार बंद राहणार असून, या दिवशी विशेष मुहूर्त ट्रेडिंग असतो, जो संध्याकाळच्या सुमारास होतो. गुरुनानक जयंती शुक्रवार, 15 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे, त्यामुळे सुट्टी असेल. शेवटी, 25 डिसेंबर (बुधवार) नाताळच्या निमित्त बाजार बंद राहणार आहे.

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी पाच दिवस सुट्ट्या आहेत - प्रजासत्ताक दिन, गुड फ्रायडे, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती आणि ख्रिसमस.

2024 मधील सुट्ट्यांची लिस्ट

1. 26 जाानेवरी 2024: शुक्रवार, प्रजासत्ताक दिन

2. 08 मार्च 2024: शुक्रवार, महाशिवरात्री

3. 25 मार्च 2024: सोमवार, होळी

4. 29 मार्च 2024 शुक्रवार, गुड फ्रायडे

5. 11 एप्रिल, 2024: गुरुवार, ईद-उल-फितर (रमजान ईद)

6. 17 एप्रिल 2024: बुधवार, श्री राम नवमी

7. 01 मे 2024: बुधवार, महाराष्ट्र दिन

8. 17 जून 2024: सोमवार, बकरी ईद

9. 17 जुलै 2024: बुधवार, मोहरम

10. 15 ऑगस्ट 2024: गुरुवार, स्वातंत्र्य दिन

11. 02 ऑक्टोबर 2024: बुधवार, महात्मा गांधी जयंती

12. 01 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, दिवाळी लक्ष्मी पूजन

13. 15 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, गुरुनानक जयंती

14. 25 डिसेंबर 2024: बुधवार, नाताळ

याशिवाय 2024 मध्ये पाच सुट्ट्या विकेंडदरम्यान असतील

1. 14 एप्रिल 2024 रविवार, डॉ. बाबासाहेब आबेंडकर जयंती

2. 21 एप्रिल 2024 रविवार, महावीर जयंती

3. 07 सप्टेंबर 2024 शनिवार, गणेश चतुर्थी

4. 12 ऑक्टोबर 2024 शनिवार, दसरा

5. 02 नोव्हेंबर 2024 शनिवार, दिवाळी-बालिप्रतिपदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT