stock market index share market nifty sensex Sakal
Share Market

‘इंडेक्स’ची रेसिपी

शेअर बाजाराचा निर्देशांक (स्टॉक मार्केट इंडेक्स) म्हणजे एकंदरीत बाजाराचा रोख कोठे आहे, हे समजण्यासाठी वापरली जाणारी पद्धत असते.

सकाळ वृत्तसेवा

- विक्रम अवसरीकर

शेअर बाजाराचा निर्देशांक (स्टॉक मार्केट इंडेक्स) म्हणजे एकंदरीत बाजाराचा रोख कोठे आहे, हे समजण्यासाठी वापरली जाणारी पद्धत असते. काही ठरावीक कंपन्या या ‘इंडेक्स’ किंवा निर्देशांकात समाविष्ट असतात आणि त्यांच्या कामगिरीवर बाजार गर्तेत कोसळत आहे, की सध्यासारखा अनंतकोटी उड्डाणे घेत आहे, हे कळते.

या निर्देशांकात सहभागी होण्यासाठी ज्या ठरावीक कंपन्या निवडल्या जातात, त्या त्यांच्या कामगिरीच्या बळावर निवडल्या जातात; पण त्यातून ‘इंडेक्स’ करायची रेसिपी वेगळी असते. सध्या जगात शेअरच्या किमतीवर आधारित निर्देशांक आणि कंपन्यांच्या मार्केट कॅपवर आधारित निर्देशांक अशा दोन प्रकारे हे ‘इंडेक्स’ तयार केले जातात.

शेअर किमतीवर आधारित निर्देशांक

कल्पना करा, की तुमची सर्व मित्रमंडळी जेवायला जमली आहेत, सर्वांनी एकत्र जेवण्यासाठी आपापले डबे आणले आहेत, अशा परिस्थितीत त्या कार्यक्रमाची सर्व सूत्रे, जो जास्तीत जास्त महागडे पदार्थ आणेल त्याच्याकडे असतील.

हे किमतीवर आधारित निर्देशांकाचे उदाहरण आहे. ज्या कंपनीच्या शेअरची किंमत जास्त त्याला या निर्देशांकात जास्त भाव; मग त्या कंपनीची स्थिती कशी का असेना. अमेरिकेतला डाऊ जोन्स निर्देशांक याच प्रकारचा आहे.

एखाद्या कंपनीची कामगिरी वाईट असली, तरी तिच्या शेअरची किंमत जास्त असेल, तर ती कंपनी या निर्देशांकाला हलवून टाकते. बोईंग कंपनीची कामगिरी कोविड काळात खूपच खालावली होती, तरीदेखील तिच्या शेअरची किंमत जास्त असल्याने किमतीवर आधारित निर्देशांकात ती आपला रुबाब राखून होती. त्यावेळी हा निर्देशांक दिशाभूल करणारे चित्र दाखवत होता.

मार्केट कॅपवर आधारित निर्देशांक

परत एकदा कल्पना करा, की सगळी मित्रमंडळी जेवायला जमली आहेत; या मेजवानीची सगळी सूत्रे उपस्थितांमध्ये जो सर्वांत श्रीमंत आहे त्याच्याकडे आहेत. मग त्याने कोणताही पदार्थ का आणला असेना. मार्केट कॅप म्हणजे त्या कंपनीचे बाजारमूल्य. एकंदरीत शेअर गुणिले शेअरची किंमत अशा प्रकारे हे मूल्य ठरवले जाते. या प्रकारच्या निर्देशांकात खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब दिसते.

‘बीएसई’, ‘एनएसई’ आणि ‘नॅसडॅक’ यांचे निर्देशांक याच प्रकारचे आहेत. ‘सेन्सेक्स’ म्हणजे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आधारभूत ३० कंपन्या आहेत, तर ‘निफ्टी’ म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५० कंपन्या असतात. या दोन्ही निर्देशांकात ‘एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. बाजार जेव्हा वर जात होता आणि एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि. कंपनी यांचे विलीनीकरण होत होते, तेव्हा या शेअरची किंमत खाली आली होती.

‘बँक बुडाली’ अशी आवई उठत होती, त्यावेळी बाकीची परिस्थिती चांगली असतानादेखील केवळ या बँकेमुळे निर्देशांक खाली येत होता.

तात्पर्य काय, तर किमतीवर आधारित निर्देशांक एखाद्या कंपनीच्या वाढलेल्या शेअरच्या किमतीमुळे बाजाराचे खरे चित्र दाखवेलच असे नाही, तर मार्केट कॅप आधारित निर्देशांकामुळे बाजाराचे सत्याच्या जवळ जाणारे चित्र दिसू शकेल. मात्र, ज्या कंपन्या छोट्या आहेत त्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल या निर्देशांकामुळे उजेडात येईलच असे नाही. त्यामुळे ‘इंडेक्स’ (निर्देशांक) कोणताही असो, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विखरूनच ठेवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT