Sensex-Nifty New High: शेअर बाजारातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने 66000 चा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतच्या व्यवहारात 66,043 चा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. आता तो 647 अंकांच्या उसळीसह 66040 च्या पातळीवर आहे.
तर निफ्टीनेही 19566 चा नवा शिखर गाठून इतिहास रचला. आता तो 164 अंकांच्या वाढीसह 19548 च्या पातळीवर आहे. आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे.
TCS 2.77 टक्के, इन्फोसिस 2.29 टक्के, टेक महिंद्रा 1.80 टक्के, विप्रो 1.37 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. तर निफ्टी मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्स वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत आहेत.
काय आहे तेजीचे कारण?
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता, बाजारातील सततच्या तेजीमागील मुख्य कारण म्हणजे रुपयाची मजबत स्थिती आहे. ते म्हणाले की, रुपयाच्या तुलनेत डॉलरचा निर्देशांक 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
जेव्हा डॉलर कमकुवत असतो तेव्हा इतर देशांसाठी ती संधी बनते. भारत अशा देशांमध्ये येतो जेथे विदेशी गुंतवणूकदार डॉलर कमकुवत झाल्यास भारतीय शेअर्समध्ये पैसे गुंतवतात.
सध्या भारतात परकीय गुंतवणूक वेगाने वाढत आहे. यावेळी देशाची परकीय गंगाजळीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, यावेळी बाजारात सकारात्मक चिन्हे दिसत आहेत आणि आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
रुपया मजबूत होत आहे
डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांनी वाढून 82.18 वर बंद झाला कारण परदेशात डॉलर कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करण्याचा कल वाढत आहे.
परकीय चलन बाजारात रुपया प्रति डॉलर 82.29 वर उघडला. दिवसभरात 82.16 चा उच्चांक आणि 82.32 चा नीचांक गाठल्यानंतर तो अखेर 23 पैशांच्या वाढीसह 82.18 प्रति डॉलरवर बंद झाला. रुपयाची आज तिसऱ्या दिवशीही तेजी कायम आहे.
TCS ने काल जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध केले
आज बाजारात तेजी असेल, असे संकेत काल संध्याकाळीच मिळाले. बुधवारी संध्याकाळी, TCS ने त्यांचा जून तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये जून तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 16.83 टक्क्यांनी वाढून रु. 11,074 कोटी झाला आहे.
आज त्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसत आहे. NSE वर TCS शेअर 91 अंकांच्या वाढीसह 3,351 अंकांवर व्यवहार करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.