Share Market Closing  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सपाट बंद; मिड-स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ, कोणत्या शेअर्सनी केली मोठी कमाई?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 October 2024: दिवसभर चढ-उतारांसह शेअर बाजारात व्यवहार झाले आणि शेवटी बाजार फ्लॅट बंद झाला. निफ्टी 25,800 च्या आसपास बंद झाला. सेन्सेक्सही घसरला आणि 84,200 च्या वर बंद झाला. निफ्टी बँकेतही घसरण झाली. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज तेजीत होते.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 34 अंकांच्या किंचित घसरणीसह 84,266 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14 अंकांच्या घसरणीसह 25,797 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर ऊर्जा, ऑइल आणि गॅस, आरोग्यसेवा, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

पण सर्वाधिक उत्साह बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दिसला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 204 अंकांच्या तेजीसह 60,358 अंकांवर तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 151 अंकांच्या तेजीसह 19,331 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 16 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 29 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा 2.93 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.22 टक्के, कोटक बँक 1.55 टक्के, इन्फोसिस 1.53 टक्के, एचसीएल टेक 1.18 टक्के, एसबीआय 1.01 टक्के, अदानी पोर्ट्स 0.93 टक्के, नेस्ले 0.68 टक्के, टीसीएस 0.32 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.12 टक्के, बजाज फायनान्स 0.12 टक्के शेअर्स वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक 2.64 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 1.54 टक्क्यांनी, एचयूएल 1.03 टक्क्यांनी, टाटा स्टील 0.98 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

मार्केट कॅपमध्ये वाढ

सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख बाजार निर्देशांक फ्लॅट बंद झाले आहेत. परंतु मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समुळे मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 474.98 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 474.35 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 63,000 कोटी रुपयांची वाढ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane: संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांची प्रतिक्रिया

Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT