Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला, निफ्टीही 25,200च्या पुढे

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 15 October 2024: मंगळवारी (15 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 82,251 च्या पातळीवर उघडला. निफ्टी जवळपास 80 अंकांच्या वाढीसह 25,200 च्या पातळीवर उघडला.

बँक निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 51,975 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही चांगली वाढ झाली. मिडकॅपमध्ये सुमारे 140 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, स्मॉल कॅपने 100 हून अधिक अंकांची झेप घेतली होती.

देशातील सर्वात मोठा IPO आज उघडणार
Hyundai Motor India च्या IPO चा प्राइस बँड 1865 रुपये ते 1960 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. Hyundai Motor India IPO चा GMP कालपर्यंत 75 रुपये होता.
Share Market Opening
रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल 2.35 लाख कोटी रुपयांवर

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले. यामध्ये कंपनीचा महसूल 2.35 लाख कोटी रुपये होता. तर या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 16,563 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 5 टक्के कमी आहे.

Share Market Opening
अमेरिकन शेअर बाजारात तेजी

अमेरिकन बाजारात, S&P आणि Dow Jones नवीन शिखरांवर बंद झाले आहेत आणि Nasdaq, IT शेअर्सचा मुख्य निर्देशांक देखील उच्च पातळीवर बंद झाला आहे. या आधारावर आज भारतात आयटी शेअर्सची चांगली कामगिरी दिसून येत आहे. जर अमेरिकेत टेक शेअर्स वाढले असतील तर भारतीय आयटी शेअर्समध्येही मोठी वाढ शक्य आहे.

BSE SENSEX

OPEC च्या(ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) मागणीच्या अंदाजात घट झाल्यामुळे कच्च्या तेलात घट झाली आहे आणि ब्रेंट क्रूड 3 टक्क्यांनी घसरून सुमारे 75 डॉलरवर आले आहे. भारतासाठी ही चांगली बातमी आहे कारण यानंतर आयात खर्च नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे.

एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक वाढ

सेन्सेक्स कंपन्यांमधील एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक 1.40 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. यानंतर भारती एअरटेल 0.98 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.88 टक्के, इन्फोसिस 0.82 टक्के, मारुती सुझुकी 0.79 टक्के, टाटा मोटर्स 0.58 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.55 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.53 टक्के वधारत होते.

याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, टायटन, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, सन फार्मा, एनटीपीसी, पॉवरग्रीड, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्सही हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

Atul Parchure : "तुमच्याबरोबर काम करायचं राहील" ; अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली

Baba Siddique Murder Case: कोण आहेत मोनू अन् गुल्लू? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखी दोघांना अटक

Latest Maharashtra News Updates : महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलली

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा

SCROLL FOR NEXT