Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 4 October 2024: शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर शुक्रवारीही बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 253 अंकांनी घसरला आणि 82,244 वर उघडला. निफ्टी 344 अंकांनी घसरून 25,452 वर तर बँक निफ्टी 608 अंकांनी घसरून 52,314 वर उघडला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये तेजी होती. तेल कंपन्यांचे शेअर्स घसरत होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी रिॲल्टीमध्ये सर्वाधिक 2.40 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय निफ्टी बँकेत 0.23 टक्के, निफ्टी ऑटोमध्ये 0.50 टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.43 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 0.34 टक्के, निफ्टी मीडियामध्ये 0.85 टक्के घसरण झाली.

तर निफ्टी मेटलमध्ये 0.96 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.62 टक्के, निफ्टी पीएसयू बँक 0.19 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक 0.29 टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स 0.66 टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स 0.53 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस 0.86 टक्के घसरले. याशिवाय केवळ निफ्टी आयटीमध्ये 0.37 टक्क्यांची वाढ झाली.

Share Market Opening
काय आहेत जागतिक संकेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी गुरुवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले.

गुरुवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 185 अंकांनी घसरला आणि 42011.59 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite मध्ये 7 अंकांची किंचित घसरण झाली आणि तो 17918.48 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 10 अंकांनी घसरला आणि 5699.94 च्या पातळीवर बंद झाला.

Share Market Opening

आशियाई बाजारांमध्ये GIFT NIFTY मध्ये 0.35 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर Nikkei 225 मध्ये 0.47 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. स्ट्रेट्स टाइम्समध्ये 0.20 टक्के वाढ झाली आहे तर हँग सेंगमध्ये सुमारे 1.56 टक्के वाढ झाली आहे. तैवान वेटेड 0.10 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे तर कोस्पी 0.54 टक्के वाढत आहे.

BSE SENSEX
मध्यपूर्वेतील संकट शेअर बाजारासाठी धोका

सध्या मध्यपूर्वेतील संकट भारतासह जगभरातील बाजारपेठांसाठी मोठा धोका आहे. जेफरीजचे ख्रिस वुड यांनी सांगितले की, भू-राजकीय परिस्थिती बिघडली तर भारत आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण होईल.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीं ही सर्वात मोठी चिंता आहे. इस्रायलने इराणच्या तेल सुविधांना लक्ष्य केल्यास कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या कंपन्यांसाठी ही परिस्थिती खूप वाईट असेल. भारतातील व्यापार तूट लक्षणीय वाढू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

SCROLL FOR NEXT