Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 15 October 2024: देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी (15 ऑक्टोबर) दिवसभर चढ-उतारानंतर घसरणीसह बंद झाला. वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकींग झाल्यामुळे बाजारात दबाव होता. निफ्टी 70 अंकांनी घसरून 25,057 वर बंद झाला. सेन्सेक्स 152 अंकांनी घसरून 81,820 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 89 अंकांनी वाढून 51,906 वर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी शेअर्समध्ये विक्री झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 121 अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि स्मॉल कॅप निर्देशांक 211 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

Share Market Closing
कोणते शेअर्स घसरले?

बीएसईच्या 30 शेअर्सपैकी 9 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह आणि 30 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि दोन शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

वाढत्या शेअर्समध्ये, आयसीआयसीआय बँक 1.95 टक्के, भारती एअरटेल 1.26 टक्के, एशियन पेंट्स 1.20 टक्के, अदानी पोर्ट्स 0.71 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.68 टक्के, एचसीएल टेक 0.58 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स 2.47 टक्के, रिलायन्स 2.05 टक्के, टाटा स्टील 1.58 टक्के, टेक महिंद्रा 1.07 टक्के, टाटा मोटर्स 1.01 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.80 टक्क्यांनी घसरले.

Share Market Closing
मार्केट कॅप 26000 कोटींनी वाढली

सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले असूनही, मार्केट कॅप वाढत आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 463.88 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 463.62 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅप 26,000 कोटींनी वाढले आहे.

BSE SENSEX
आज बाजारातील घसरणीचे कारण काय?

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांसारख्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम बाजारभावावर झाला. तसेच, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.49% झाली. यामुळे व्याजदरात लवकरच कपात होण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.

खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.49 टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात हा दर 3.65 टक्के होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 5.02 टक्के होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

SCROLL FOR NEXT