Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी खाली, आयटी आणि बँकिंग शेअर्स कोसळले

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 16 October 2024: बुधवारी (16 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. प्री-ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स 180 अंकांची घसरण दर्शवत होता आणि निफ्टी 50 अंकांची घसरण दर्शवत होता. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 81,600 वर उघडला.

निफ्टी 50 अंकांच्या घसरणीसह 25,000 च्या वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 51770 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित घसरणीसह लाल रंगात उघडले. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण दिसून आली, परंतु BPCL, HPCL, HAL सारख्या PSU शेअर्सनी चांगली वाढ नोंदवली.

Share Market Opening

आज निफ्टीमध्ये एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, बीपीसीएल, बीईएल आणि ॲक्सिस बँक यांच्यात चांगली वाढ दिसून आली. तर ट्रेंट, नेस्ले इंडिया, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक या कंपन्यांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. आज बजाज ऑटोचे निकाल येतील. L&T Tech आणि Mphasis च्या निकालांवर फ्युचर्स मार्केटमध्ये लक्ष ठेवले जाईल.

आज सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ 12 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर उर्वरित 18 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर 24 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते.

Share Market Opening
जागतिक बाजारपेठेत काय स्थिती?

2 दिवसांच्या वाढीनंतर अमेरिकन बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले . नवीन इंट्राडे उच्चांक केल्यानंतर, डाऊ 325 अंकांनी घसरला आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, तर Nasdaq सुमारे 200 अंकांनी घसरला.

सकाळी GIFT निफ्टी 60 अंकांनी घसरला आणि 25050 च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स सपाट होते. दुसरीकडे, जपानमधील निक्केई 700 अंकांनी घसरला होता. कच्च्या तेलाचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून तो 3% घसरून 75 डॉलरच्या खाली आहे. सोने 10 डॉलरने वाढले आहे आणि 2675 डॉलर्सवर गेले आहे तर चांदी 1 टक्क्यांनी वाढली आहे.

BSE SENSEX

बीएसईचे बाजार भांडवल 464.56 लाख कोटी रुपये झाले आहे आणि आज शेअर बाजारात 3195 शेअर्समध्ये व्यवहार होत आहे. यापैकी 1901 शेअर्स वाढीसह आणि 1161 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 133 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली

SCROLL FOR NEXT