Share Market Latest Update  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; सेन्सेक्स 300 अंकांनी खाली, निफ्टीही 25,000 अंकांवर बंद

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 16 October 2024: बुधवारी (16 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून आली आणि निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सोमवारच्या वाढीनंतर सलग दोन दिवस बाजारात घसरण सुरू आहे.

आज, सकाळची घसरणीसह सुरुवात झाली असूनही, बाजाराने किंचित वाढ दर्शविण्याचा प्रयत्न केला, परंतु यानंतर पुन्हा घसरण झाली. सेन्सेक्स 318 अंकांनी घसरून 81,501 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 104 अंकांनी घसरून 51,801 वर बंद झाला.

Share Market Closing

गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि ऑटो शेअर्सच्या घसरणीमुळे बाजारात ही विक्री झाली आहे. आजच्या सत्रात मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 5 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 34 शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये एचडीएफसी लाइफ 1.79 टक्के, डॉ. रेड्डी 1.34 टक्के, ग्रासिम 1.05 टक्के, एचडीएफसी बँक 0.97 टक्के, बजाज ऑटो 0.88 टक्के, भारती एअरटेल 0.86 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 2.76 टक्के, इन्फोसिस 2.05 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.39 टक्के, अदानी पोर्ट्स 1.21 टक्के, टाटा मोटर्स 1.19 टक्के, आयटीसी 1.11 टक्के, टायटन 1.06 टक्के घसरले.

Share Market Closing
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ज्या क्षेत्रांचे शेअर्स वाढले आहेत त्यात ऊर्जा, ऑइल आणि गॅस, इन्फ्रा, रिअल इस्टेट यांचा समावेश आहे. तर आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली.

BSE SENSEX

बाजारातील घसरणीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 463.06 लाख कोटी रुपयांवर बंद झाले तर शेवटच्या सत्रात ते 463.86 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 80,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,068 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,031 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,931 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 106 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 262 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 32 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Assembly Elections: महायुतीत जागावाटपाचा पेच वाढणार? देवेंद्र फडणविसांना पत्र, रामदास आठवलेंकडून 'इतक्या' जागांची मागणी

Nikki Tamboli : "ते सगळं फेक.." निक्की बनली अरबाजचं नातं तुटण्याचं कारण ? निक्कीकडूनच खुलासा

Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

"अभिनेत्रींनी चेहऱ्यावर बोटॉक्सचा भडीमार करणं चुकीचं" ; मर्डर फेम मल्लिका शेरावतने व्यक्त केली चिंता , कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली

SCROLL FOR NEXT