Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 81,146 अंकावर, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 8 October 2024: देशांतर्गत शेअर बाजार सपाट उघडला आहे. जागतिक बाजारातून येणा-या संकेतांसोबतच, भारतीय बाजारपेठेतील देशांतर्गत संकेत देखील महत्त्वाचे आहेत आणि यावेळी बाजारातील बहुतांश तज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत.

आज शेअर बाजार उघडताना संमिश्र व्यवसाय दिसत आहे आणि बीएसई सेन्सेक्स किंचित वाढत आहे तर एनएसई निफ्टी देखील वाढत आहे. आजच्या ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स 64.48 अंकांच्या तेजीसह 81,155 वर व्यवहार करत आहे. निफ्टीने 36.45 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 24,832 वर व्यवहार करत आहे.

Share Market Opening
भू-राजकीय तणावाचा फटका

शेअर बाजाराला भू-राजकीय तणावाचा फटका बसला आहे. दुसरीकडे इराणवर इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने कच्च्या तेलाचा दर दीड महिन्यात प्रथमच 81 डॉलरच्या वर गेला आहे. सोमवारी तो सलग सातव्या दिवशी वाढला आहे.

अमेरिकेतही कच्च्या तेलात वाढ आणि रोखे उत्पन्न वाढल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे. डाऊ 400 अंकांनी घसरला आणि नॅस्डॅक 215 अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आज GIFT निफ्टी 120 अंकांनी घसरून 24900 च्या खाली गेला होता.

परंतु त्यात 150 अंकांची रिकव्हरी दिसून आली आणि तो 25,000 च्या वर व्यवहार करत होता. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि निक्केई 300 अंकांनी घसरला. चिनी बाजारात 10 टक्क्यांची वाढ दिसून येत होती.

Share Market Opening

या सोबतच हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचा पराभव आणि काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात बराच चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

कोणते शेअर्स तेजीत?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये 1.14 टक्क्यांनी वाढ होत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

दुसरीकडे, बीएसईवर एसबीआयच्या शेअर्समध्ये सुमारे दीड टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. एचडीएफसी बँक आणि एल अँड टीच्या शेअर्समध्येही एक टक्का वाढ दिसून येत आहे.

BSE SENSEX

राष्ट्रीय शेअर बाजारातील टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 4.30 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 3.25 टक्क्यांची घसरण होत आहे. JSW स्टीलच्या शेअर्समध्ये 2.53 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. हिंदाल्कोचे शेअर्स 2.26 टक्क्यांनी घसरले आहेत.

टायटनच्या शेअर्समध्ये सुमारे दीड टक्क्यांची घसरण आहे. BSE वर TCS चे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. एचसीएल टेकचे शेअर्स दीड टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 1.30 टक्क्यांची घसरण झाली आणि आयटीसीच्या शेअर्समध्येही किंचित घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT