Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 14 October 2024: गेल्या दोन आठवड्यांच्या चढ-उतारानंतर, गुंतवणूकदार आणि व्यापारी या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात काही प्रमाणात स्थिरतेची अपेक्षा करत आहेत. आज सोमवारी (14 ऑक्टोबर) शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 81,700 च्या आसपास व्यवहार करत होता.

त्याच वेळी, निफ्टी सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,050 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी बँक 160 अंकांच्या वाढीसह 51,333 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात सुमारे 350 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, मेटल निर्देशांक सुमारे 1.3% ने वाढला होता.

Share Market Opening

जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत होते. बँकांच्या भक्कम निकालाच्या जोरावर शुक्रवारी अमेरिकन बाजारात चांगली तेजी दिसून आली. डाऊमध्ये 400 अंकांची वाढ झाली आणि विक्रमी पातळी गाठली, तर S&P 500 ने नवीन शिखर गाठले. Nasdaq 60 अंकांनी वर होता. सकाळी GIFT निफ्टी 35 अंकांनी वाढून 25,100 च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स सपाट होते आणि जपानचे बाजार आज बंद आहेत.

एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आज निकाल जाहीर करतील. दिग्गज संरक्षण कंपनी एचएएलला 'महारत्न' दर्जा मिळाला, त्यामुळे आज या स्टॉकवर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

Share Market Opening
कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर 10 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे निफ्टी 50 कंपन्यांपैकी 39 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह आणि 10 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह तर 1 कंपनीचा शेअर कोणताही बदल न करता व्यवहार करत होते.

BSE SENSEX

सेन्सेक्सच्या कंपन्यांपैकी JSW स्टीलने आज सर्वाधिक 1.93 टक्के वाढीसह व्यवहार सुरू केला. याशिवाय लार्सन अँड टुब्रोने 1.51 टक्के, टाटा स्टील 1.43 टक्के, इन्फोसिस 0.84 टक्के, टेक महिंद्रा 0.82 टक्के, एचडीएफसी बँक 0.78 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.61 टक्के वाढीसह व्यापार सुरू केला.

यासोबतच एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, सीटीएस, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सही हिरव्या रंगात उघडले.

कोणते शेअर्स घसरले?

दुसरीकडे, आज महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह उघडले. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 0.28 टक्के, भारती एअरटेल 0.23 टक्के, सन फार्मा 0.16 टक्के, पॉवरग्रीड 0.15 टक्के, ॲक्सिस बँक 0.14 टक्के, नेस्ले इंडिया 0.14 टक्के, बजाज फायनान्स 0.10 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.09 टक्के आणि टायटन 0.09 टक्क्यांनी शेअर्स घसरले.

आज बीएसईचे बाजार भांडवल बघितले तर ते 463.18 लाख कोटी रुपयांवर आले आहे आणि ते 460 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. बीएसईवर 3153 शेअर्सची खरेदी-विक्री होत असून त्यापैकी 1897 शेअर्स वधारत आहेत. 1118 शेअर्समध्ये घसरण झाली असून 138 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: ''एकालाही सोडणार नाही... इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी केलेली खपवून घेणार नाही'' बाबा सिद्दीकी प्रकरणात मुख्यमंत्री भडकले

Ratan Tata: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! कौशल्य विकास विद्यापीठ आता रतन टाटांच्या नावाने ओळखले जाणार

Mallika Sherawat: माझं लक्ष वेधून घेण्यासाठी सेटवर भांडायचे अनिल कपूर अन् नाना पाटेकर; मल्लिका शेरावतचा दावा अन्...

Latest Maharashtra News Live Updates : बोपदेव घाटात पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस गस्त

Jalgaon Dengue Update : ‘डेंगी’चा ‘डंख’! जिल्ह्यात नऊ महिन्यांत 82 रुग्ण; सप्टेंबरमध्ये उच्चांकी 53 रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT