stock market crash Sakal
Share Market

Share Market Closing: प्रॉफिट बुकींगमुळे बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,200ने घसरला, निफ्टी 25,800वर

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 30 September 2024: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह झाली. आज बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले. सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी सर्व निर्देशांकात 1 ते 1.5 टक्क्यांची घसरण झाली.

आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 1272 अंकांच्या घसरणीसह 84,299 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 368 अंकांच्या घसरणीसह 25,811 अंकांवर बंद झाला. इंडिया VIX 7% वर होता. ऑटो, पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही दिवसभर दबावाखाली होते.

Share Market Closing

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स वाढीसह तर 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये JSW स्टील 2.86 टक्क्यांच्या वाढीसह, NTPC 1.27 टक्क्यांच्या वाढीसह, टाटा स्टील 1.17 टक्क्यांच्या वाढीसह, टायटन 0.41 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market Closing

रिलायन्सचा शेअर 3.23 टक्के, ॲक्सिस बँक 3.12 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.58 टक्के, नेस्ले 2.12 टक्के, टेक महिंद्रा 2.10 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.03 टक्के, मारुती सुझुकी 1.99 टक्के घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बाजारात सर्वाधिक प्रॉफिट बुकींग बँकिंग शेअर्समध्ये झाली आहे. निफ्टी बँकही 857 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑटो आणि आयटी शेअर्समध्येही घसरण झाली.

फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाली. केवळ मेटल आणि मीडिया शेअर्स वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांचे 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप घसरून 474.25 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 477.93 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधासभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

ऑनलाइन फोन मागवला, ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी संपवले, मृतदेहाचे तुकडे करून फेकले, कारण काय?

Bigg Boss Marathi 5 : "अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन" ; त्या भांडणाचा राग घराबाहेर पडताच पॅडीनी केला व्यक्त , "घराबाहेर येताच..."

SCROLL FOR NEXT