Stock market Nifty 50, Sensex rise for 5th straight day; ICICI Bank, RIL among top contributors Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार नवीन उच्चांकावर; निफ्टीने प्रथमच पार केला 22,180चा टप्पा, कोणते शेअर्स वाढले?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 19 February 2024: सोमवारी शेअर बाजारात नवा विक्रमी उच्चांक झाला. निफ्टीने प्रथमच 22,186 च्या पातळीला स्पर्श केला. सरतेशेवटी निर्देशांक 81 अंकांनी वाढला आणि 22,122 वर बंद झाला.

सेन्सेक्सही 281 अंकांच्या वाढीसह 72,708 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात झाली. तर आयटी आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रात घसरण झाली. (Stock market Nifty 50, Sensex rise for 5th straight day; ICICI Bank, RIL among top contributors)

Share Market Closing

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, सिप्ला, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि डॉक्टर रेड्डीज यांचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले आहेत.

शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांच्या यादीत कोल इंडिया, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, एलटीआय माइंड ट्री, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्सचा समावेश होता.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारात निफ्टी आयटी निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी दोन सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले, तर अदानी विल्मरचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे तीन टक्क्यांनी वाढले.

गुंतवणूकदारांनी 2.33 लाख कोटी कमावले

शेअर बाजारातील वाढीमुळे बाजार भांडवलात विक्रमी वाढ झाली. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 392 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. गेल्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 389.41 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात 2.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

सुला विनयार्डचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक घसरले

सोमवारी सुला विनयार्डचे शेअर्स 7% पेक्षा जास्त घसरले आहेत. स्टॉक 7.6% घसरून 570.60 च्या इंट्राडे नीचांकावर आला होता. विदेशी कंपनी Vervinlist Asia Pte ने कंपनीचे 8.34% शेअर्स 434.89 कोटी रुपयांना विकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT