Share Market Nifty slips below 21,750, Sensex falls 350 pts dragged by financial stocks  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स 434 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 21 February 2024: बुधवारी शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 434 अंकांनी घसरून 72,623 वर आला. निफ्टी 141 अंकांनी घसरला आणि 22,055 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी, पीएसयू आणि ऑटो क्षेत्रात झाली. (Stock market Sensex down over 400 points, Nifty 50 ends 0.64 percent lower)

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आज निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण झाली, तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 34 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग

शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीत टाटा स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश होता, तर शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प आणि एनटीपीसीच्या शेअर्सचा समावेश होता.

अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 8 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी विल्मारमध्ये घसरण झाली तर अदानी टोटल गॅस किंचित वाढीसह बंद झाला.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

शेअर बाजारात चढ-उतार दरम्यान, एसबीआय, महिंद्रा, ग्रासिम इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. व्हर्लपूल इंडिया आणि पॉलीप्लेक्स कॉर्पचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील घसरणीमुळे बाजारातील भांडवल घसरले आहे. बीएसईवर कंपन्यांचे बाजार भांडवल 388.82 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. मागील सत्रात 391.62 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवसायात गुंतवणूकदारांचे 2.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

मीडिया शेअर्सवर दबाव होता

बुधवारी बहुतांश मीडिया शेअर्सवर दबाव होता. निफ्टी मीडिया इंडेक्स 2.83 टक्क्यांनी घसरत आहे. सर्वात मोठी घसरण झी एंटरटेनमेंटमध्ये दिसून आली. कंपनीचा शेअर 10.49% नी घसरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांना धक्का! राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT