Stock market Sensex, Nifty 50 end 1 percent lower as RBI Monetary policy  Sakal
Share Market

Share Market Closing: RBIच्या निर्णयाचा शेअर बाजारावर परिणाम; बँकिंग आणि NBFC शेअर्स घसरले

Share Market Closing Latest Update 8 February 2024: आरबीआय एमपीसीच्या बैठकीनंतर बाजारात चौफेर विक्री झाली. बँकिंग, वाहन आणि इतर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी घसरला आणि 71,450 च्या जवळ बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 February 2024: आरबीआय एमपीसीच्या बैठकीनंतर बाजारात चौफेर विक्री झाली. बँकिंग, वाहन आणि इतर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी घसरला आणि 71,450 च्या जवळ बंद झाला. निफ्टीही जवळपास 200 अंकांनी घसरला आणि 21,700च्या पातळीवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या सत्रात बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळे निफ्टी बँक निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक 1.76 टक्क्यांच्या घसरणीसह 45012 वर बंद झाला. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

शेअर बाजारात घसरण

याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. तेल, ऊर्जा, मीडिया, आयटी क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वधारले आणि 22 शेअर्स घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 36 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स घसरले?

आज पुन्हा पेटीएमच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण झाली, तर आयटीसी आणि ब्रिटानियाचे शेअर 4 टक्क्यांनी घसरले. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढले आहेत.

S&P BSE SENSEX

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत एलआयसीचे कौतुक केले होते. गुरुवारी, एलआयसीचे शेअर्स 9.5 टक्क्यांनी वाढून 1144 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आणि पहिल्यांदाच एलआयसीचे मार्केट कॅप 7 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 53,000 कोटी रुपयांची घसरण

आजच्या व्यवहारात, बाजारातील विक्रीमुळे कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 388.72 लाख कोटी रुपये आहे. मागील व्यापार सत्रात मार्केट कॅप 389.25 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 53,000 कोटी रुपयांची घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT