Stock market to open on Saturday: Here's all you need to know about special trading session  Sakal
Share Market

Saturday Trading Session: इतिहासात पहिल्यांदाच शनिवारीही शेअर बाजार राहणार सुरू; काय आहे कारण?

Saturday Trading Session: शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतात पण यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) शनिवारी 20 जानेवारी रोजी सुरु राहणार आहे. दोन्ही एक्सचेंजेस एका दिवसासाठी डिजास्टर रिकवरी साइटवर स्विच करत आहेत.

राहुल शेळके

Saturday Trading Session: शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतात पण यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) शनिवारी 20 जानेवारी रोजी सुरु राहणार आहे. दोन्ही एक्सचेंजेस एका दिवसासाठी डिजास्टर रिकवरी साइटवर स्विच करत आहेत.

या साइटच्या चाचणीसाठी बाजार सुरु असणार आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे साइट क्रॅश झाली तरी व्यापार सुरू ठेवता यावा यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. 20 जानेवारी रोजी दोन्ही एक्सचेंजवर एक विशेष सत्र आयोजित केले जात आहे.

शनिवारी 20 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसई दोन लहान सत्रांमध्ये काम करतील. पहिले विशेष सत्र प्राथमिक साइटवर असेल. या सत्रात बीएसई आणि एनएसईचे प्री-ओपन सत्र सकाळी 9 वाजता सुरू होईल. यानंतर सामान्य बाजार सकाळी 9:15 वाजता उघडेल आणि 10 वाजता बंद होईल.

दुसरे लाईव्ह सत्र डिजास्टर रिकवरी साइटवर असेल. या अंतर्गत, डिजास्टर रिकवरी साइटवरवर प्री-ओपनिंग सत्र सकाळी 11:15 वाजता सुरू होईल.

क्लोजिंग सेशन सत्र दुपारी 12:50 वाजता संपेल. दुपारी 1 वाजता बाजार बंद होण्याची घंटा ऐकू येईल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, मार्केट सकाळी 9:15 वाजता उघडेल आणि प्राथमिक साइटवर सकाळी 10 वाजता बंद होईल. डिजास्टर रिकवरी साइटवर ,ते सकाळी 11:30 वाजता उघडेल आणि दुपारी 12:30 वाजता बंद होईल.

सेबी नवीन वर्षात डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटची चाचणी घेत आहे. स्टॉक एक्स्चेंज साइटवर सायबर हल्ला झाल्यास किंवा साइट क्रॅश झाल्यास, अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही व्यत्यय किंवा अडथळाशिवाय व्यापार सुरू ठेवण्यासाठी ट्रेडिंग डिझास्टर रिकव्हरी साइटवर हलविले जाईल. शेअर बाजारात स्थिरता आणणे आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT