Stock market today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात चांगली रिकव्हरी; निफ्टी 22,600च्या वर बंद; आयटी शेअर्स तेजीत

Share Market Today: देशांतर्गत बाजारात तीव्र चढ-उतार असूनही बुधवारी (22मे) व्यवहार बंद होईपर्यंत चांगली रिकव्हरी होती. सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून 74,221 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 68 अंकांनी वाढून 22,597 च्या पातळीवर पोहोचला आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 22 May 2024: देशांतर्गत बाजारात तीव्र चढ-उतार असूनही बुधवारी (22मे) व्यवहार बंद होईपर्यंत चांगली रिकव्हरी होती. सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून 74,221 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 68 अंकांनी वाढून 22,597 च्या पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक 266 अंकांनी घसरून 47,781 च्या पातळीवर बंद झाला.

दिवसभरात बाजारात मंदीचे व्यवहार होताना दिसले. PSU निर्देशांक सलग सातव्या दिवशी वाढले आणि निफ्टी दिवसभरात 22,600 च्या वर जात होता, परंतु नंतर बाजार वरच्या पातळीच्या खाली घसरला.

आज शेअर बाजाराच्या व्यवहारात अशा अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यात मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्थान झिंकच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा दिला आहे, कमकुवत निकालानंतर BHELचे शेअर्स 5% घसरले आहेत. भारतात लोकसभा निवडणुका सुरू झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार दररोज 1800 कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बुधवारी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात काहीशा तेजीने झाली. शेअर बाजारातील वाढीदरम्यान, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण झाली, तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात वाढ झाली.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये सिप्ला, टाटा कंझ्युमर, एचयूएल, कोल इंडिया, ब्रिटानिया, डॉ. रेड्डीज आणि रिलायन्स यांचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय, हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाइफ आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजारातील तेजी दरम्यान कोल इंडिया लिमिटेड आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

मार्केट कॅपने पुन्हा गाठला विक्रमी उच्चांक

भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने आज पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 416.07 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे गेल्या सत्रात 414.62 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT