Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद; कोणते शेअर्स झाले घायाळ?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 28 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या वाढीसह हिरव्या रंगात उघडले परंतु मर्यादित व्यवहार झाल्यानंतर बाजारात घसरण झाली. दुपारच्या व्यवहारादरम्यान बाजार इंट्राडे उच्च पातळीच्या खाली घसरला. फार्मा वगळता सर्व निर्देशांक लाल रंगात होते. India VIX 5 टक्क्यांहून अधिक वाढला.

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरून 75,170 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 139 अंकांनी घसरून 49,142 वर बंद झाला. PSU बँका आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

जर आपण क्षेत्रीय निर्देशांकावर नजर टाकली तर, तेल, गॅस, भांडवली वस्तू, दूरसंचार, पीएसयू बँक, पॉवर आणि रियल्टीमध्ये घसरण झाली. BSE मिडकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1 टक्क्यांनी खाली गेला आहे.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस आणि ओएनजीसी यांना सर्वाधिक नुकसान झाले. Divi's Laboratories, SBI Life Insurance, HDFC Life, Grasim Industries आणि Hero Moto Corp यांनी मंगळवारी टॉप गेनर्सच्या यादीत स्थान मिळवले.

S&P BSE SENSEX

दुसरीकडे, सेन्सेक्सवर, हॅटसन ऍग्रो, 3M इंडिया, गरवारे फायबर, हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन आणि प्रिझम जॉन्सन हे सर्वाधिक नफा मिळवणारे शेअर्स होते आणि सर्वाधिक घसरणीच्या यादीत आयनॉक्स विंड, सोम डिस्टिलरीज, अल्जी इक्विपमेंट्स, भारत डायनॅमिक्स आणि इंडियाबुल्स यांचा समावेश होता.

गुंतवणूकदारांचे 3.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 27 मे रोजी 416.62 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी, 24 मे रोजी 419.95 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.33 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.33 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT