Stock market today Nifty 50, Sensex snap 5-day winning streak on profit booking  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 16 January 2024: शेअर बाजारात मंगळवारी नफा बुकिंग झाली. प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 199 अंकांनी घसरून 73,128 वर आला. निफ्टीही 65 अंकांनी घसरला आणि 22,032 वर बंद झाला. बाजारात आज आयटी, फार्मा आणि रिअॅल्टी क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली. Divi's Lab आणि HCL Tech निफ्टीमध्ये सर्वाधिक 2-2 टक्क्यांनी घसरले. तर BPCL सुमारे 3% वाढून सर्वाधिक तेजीत होता.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी सर्व निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली. शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये टायटन, आयटीसी, टाटा स्टील आणि मारुती सुझुकीच्या शेअर्सचा समावेश आहे, तर नुकसान झालेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसी आणि आरआयएलच्या शेअर्सचा समावेश आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ब्रँड कॉन्सेप्ट, एनएमडीसी लिमिटेड, टाटा मोटर्स, देवयानी इंटरनॅशनल, ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि एक्साइड इंडस्ट्रीज यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

तर आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, स्टोव्ह क्राफ्ट, एचडीएफसी लाइफ, ग्लोबल स्पिरिट, महिंद्रा अँड महिंद्रा, ओम इन्फ्रा, पटेल इंजिनिअरिंग, युनिपार्ट्स इंडिया, कामधेनू लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी घसरणीसह बंद झाले. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2.52 टक्के घसरण झाली तर अंबुजा सिमेंटचा शेअर 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 1.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान

बीएसईवर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 16 जानेवारी रोजी 374.99 लाख कोटी रुपयांवर आले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी 15 जानेवारीला 376.09 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.1 लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel यांचं ठरलं! नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, भावी खासदार उल्लेख; कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Latest Maharashtra News Updates : आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे उपोषण सुरूच

Prashant Damle : हास्यसम्राट प्रशांत दामले का बनले हिटलर? ‘मु. पो. बोंबिलवाडी’ मधल्या भूमिकेबद्दल दिलं स्पष्टीकरण

Ichalkaranji Assembly Elections 2024: नाराज नाही! बंडखोरी करणार नाही; कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मते जाणून घेणार :सुरेश हाळवणकर

Kangana Ranaut : कंगनाचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र ; अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT