Share Market Latest Update  Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी पातळीवर बंद; मार्केट कॅप 4 लाख कोटींनी वाढले

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 23 September 2024: आज निफ्टी 26,000 च्या अगदी जवळ पोहोचला होता. सेन्सेक्सही विक्रमी उच्चांक गाठत 84,900च्या पुढे पोहोचला होता. बँक निफ्टी प्रथमच 54,000 च्या वर पोहोचला आणि वाढीसह बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही आज विक्रम केले. ऑटो, पीएसयू बँक, रियल्टीसह बहुतांश निर्देशांक वधारत होते. आयटी निर्देशांकात किंचित घसरण झाली.

बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे बीएसई सेन्सेक्स 384 अंकांनी वधारून 84,928 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 148 अंकांनी वधारून 25,939 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा 3.18%, एसबीआय 2.35%, भारती एअरटेल 2.26%, एचयूएल 1.54%, कोटक महिंद्रा बँक 1.49%, अल्ट्राटेक सिमेंट 1.42%, अदानी पोर्ट्स 1.24%, टाटा स्टील 1.22%, NTFC 1.03% वाढीसह बंद झाले.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारात घसरलेल्या शेअर्समध्ये फ्यूजन शेअर (-9.99%), एमक्लाउड शेअर (-5.80%) घसरला तर मिडकॅप कंपन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली. याशिवाय टॉरंट पॉवर शेअर (-2.57%), व्होल्टास शेअर (-2.39%), RVNL शेअर (-1.88%), पेटीएम शेअर (-1.83%) आणि Alkem शेअर (-1.70%) घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाल्यामुळे शेअर बाजाराचे मार्केट कॅप नव्या ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले आहे. प्रथमच, बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 476 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात 471.71 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 4.29 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,233 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,381 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,731 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 121 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 345 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 40 शेअर्सनी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

Lohegaon Airport चे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, आता विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

SCROLL FOR NEXT