Stock market today Sensex gains 526 points, RIL, Maruti Suzuki, private bank stocks shine Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 526 अंकांच्या वाढीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, शेअर बाजार तेजीसह बंद झाला, बीएसईवरील सेन्सेक्स 526 हून अधिक अंकांच्या वाढीसह 72,996 वर बंद झाला. तर NSE वर निफ्टी 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 22,147 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 27 March 2024: बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, शेअर बाजार तेजीसह बंद झाला, बीएसईवरील सेन्सेक्स 526 हून अधिक अंकांच्या वाढीसह 72,996 वर बंद झाला. तर NSE वर निफ्टी 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 22,147 वर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, वाहन, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर आयटी, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी, मेटल आणि मीडिया शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Sensex Today

आजच्या व्यवहारात स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. मात्र, मिडकॅप निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे.

Nifty 50 Today

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

आजच्या बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. रिलायन्सचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. रिलायन्सने आज 3000 रुपयांचा उच्चांक गाठला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समुळे शेवटच्या काही मिनिटांत बाजार आणखी उंचावला.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांनी कमावले 1.33 लाख कोटी

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे बाजार मूल्य 383.85 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 382.52 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मारुती सुझुकीचे मार्केट कॅप 4 लाख कोटींच्या पुढे

बुधवारी मारुती सुझुकीच्या शेअर्सने 12,722.70 चा विक्रमी उच्चांक गाठला. यासह शेअरच्या मार्केट कॅपने 4 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला. कंपनीच्या मार्केट कॅपने 4,00,004.96 कोटी रुपयांच्या इंट्राडे सर्वोच्च पातळीवर पोहोचला. मारुती सुझुकी ही NSE वरील पहिली ऑटो कंपनी बनली आहे, जिच्या मार्केट कॅपने 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT