Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार विक्री, सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला, आयटी आणि बँकिंगवर दबाव

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. प्रॉफिट बुकींगमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 352 अंकांनी घसरून 72,790 वर आला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 26 February 2024: सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. प्रॉफिट बुकींगमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 352 अंकांनी घसरून 72,790 वर आला. निफ्टीही 90 अंकांनी घसरून 22,122 वर आला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किरकोळ वाढ झाली. शेअर बाजारात लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड, एचयूएल आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर एशियन पेंट्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि टायटनच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market

ऑटो, एनर्जी, इन्फ्रा आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 37 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आज कोणते शेअर्स तेजीत?

आज निफ्टीच्या वाढीमध्ये L&T चा सर्वाधिक वाटा आहे. शुक्रवारीही या शेअरमध्ये वाढ झाली. कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत आणि ब्रोकरेज देखील सकारात्मक आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या नकारात्मक अहवालानंतर पेंट स्टॉकवर दबाव होता.

सत्राच्या सुरुवातीपासूनच एशियन पेंट्सवर दबाव होता. हा शेअर 4% च्या घसरणीसह बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती घसरल्याने मेटल शेअर्सवरही दबाव दिसून आला.

S&P BSE SENSEX

व्होडाफोन आयडियामध्ये नफा बुकिंग दिसून आले, त्यानंतर स्टॉक सुमारे 4% ने खाली आला. निधी उभारणीच्या पर्यायांवर विचार करण्यासाठी मंगळवारी या कंपनीची संचालक मंडळाची बैठक आहे. आज या शेअरवर सकारात्मक ब्रोकरेज अहवालही जारी करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 76,000 कोटी रुपयांची घसरण

शेअर बाजारातील घसरणीमुळे बाजारातील बाजार भांडवलात घसरण झाली आहे. बाजारात कंपन्यांचे मार्केट कॅप 392.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले जे गेल्या सत्रात 392.81 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 76,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

पॉवर ग्रिडचा शेअर विक्रमी उच्चांकावर

पॉवरग्रिड शेअर्सने सोमवारी इंट्राडे उच्चांक 291.50 गाठला, जी स्टॉकची सर्वोच्च पातळी आहे. कंपनीचे शेअर्स इंट्राडे 3.39% वाढून 291.50 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 79% वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT