Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; मिड-स्मॉलकॅप निर्देशांक तेजीत

Share Market Closing Today: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) दिवसभराच्या चढ-उतारानंतर बाजार घसरणीवर बंद झाले. निफ्टी 34 अंकांनी घसरून 24,964 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 11 October 2024: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) दिवसभराच्या चढ-उतारानंतर बाजार घसरणीवर बंद झाले. निफ्टी 34 अंकांनी घसरून 24,964 वर बंद झाला. सेन्सेक्स 230 अंकांनी घसरून 81,381 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 358 अंकांनी घसरून 51,172 वर बंद झाला.

मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांकात आज वाढ झाली. मिडकॅप निर्देशांक सुमारे 300 अंकांनी वाढून 59,225 वर पोहोचला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 100 अंकांनी वाढून 19,020 वर बंद झाला.

Share Market Closing
एचसीएल टेकमध्ये सर्वाधिक वाढ

शुक्रवारी सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात आणि उर्वरित 13 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले. तर निफ्टी 50 मधील 50 शेअर्सपैकी 28 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात आणि 22 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये आज एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक 1.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर टीसीएसचे शेअर्स 1.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये चांगली वाढ

याशिवाय टेक महिंद्राचे शेअर्स 1.42 टक्क्यांच्या वाढीसह आणि JSW स्टीलचे शेअर्स 1.02 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 1.83 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.56 टक्के, पॉवर ग्रिड 1.18 टक्के, मारुती सुझुकी 1.13 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

आज तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टायटन, इन्फोसिस, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया यांचा समावेश आहे.

लाल रंगात बंद झालेल्या शेअर्सच्या यादीत ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 29.7 हजार कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 10 ऑक्टोबर 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,62,00,104.97 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 11 ऑक्टोबर 2024 रोजी इक्विटी मार्केटमधील व्यवहाराच्या शेवटी मार्केट कॅप 4,62,29,891.08 कोटी रुपये झाले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 29,786.11 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT