Share Market Latest Update  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 20 September 2024: शुक्रवारी (20 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारांची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टी देखील सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,500 च्या वर उघडला. बँक निफ्टी विक्रमी उच्चांक गाठत होता. आज मिडकॅप निर्देशांकातही चांगली वाढ झाली आहे.

निफ्टी 110 अंकांनी वाढून 25,525 वर तर बँक निफ्टी 198 अंकांनी वाढून 53,235 वर उघडला. चलन बाजारात, रुपया 5 पैशांनी मजबूत झाला आणि 83.63/$ वर उघडला.

अमेरिकन बाजारात तेजी

गुरुवारी अमेरिकन बाजारात तेजी दिसून आली आणि प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 1.26 टक्क्यांच्या वाढीसह 42,025.19 अंकांवर बंद झाला. डाऊ जोन्स इतिहासात प्रथमच 42 हजार अंकांच्या पुढे बंद झाला आहे.

S&P 500 निर्देशांकात 1.7 टक्के आणि तंत्रज्ञान-केंद्रित निर्देशांक Nasdaq मध्ये 2.51 टक्के वाढ झाली आहे. S&P500 निर्देशांकाने काल प्रथमच 5,700 चा टप्पा ओलांडला.

Share Market Opening

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात केल्यानंतर शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आहे. बाजाराला फेडरल रिझर्व्हकडून 0.25 टक्के कपातीची अपेक्षा होती. यूएस फेडने अपेक्षेपेक्षा जास्त कपात केली असून आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत.

Share Market Opening

आशियाई बाजारातही तेजी

आज शुक्रवारी आशियाई बाजारात जबरदस्त वाढ दिसून आली. जपानचा निक्केई 1.9 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे, तर टॉपिक्स निर्देशांक 1.63 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.45 टक्के आणि कोस्डॅक 1.51 टक्क्यांनी वर आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक आज तेजीची चिन्हे दाखवत आहे.

BSE SENSEX

कोणते शेअर्स वाढले?

सुरुवातीच्या व्यापारात, JSW स्टीलचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्समध्ये आघाडीवर आहेत. टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा सारखे शेअर्स देखील प्रत्येकी 1% पेक्षा जास्त वाढले आहेत. दुसरीकडे, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, टायटन यांसारखे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी, 19 सप्टेंबर 2024 रोजी, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FII) निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी 2547.53 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 19 सप्टेंबर रोजी 2012.86 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : शुभम जोशी यांची श्री साई संस्थान शिर्डी येथे मुख्य प्रधान पुजारी म्हणून निवड

SCROLL FOR NEXT