Amit Shah On Stock Market Sakal
Share Market

Amit Shah: अमित शहांचा दावा! 4 जूनला बाजार नवीन उच्चांक गाठेल; गुंतवणूकदारांना दिला मोलाचा सल्ला

राहुल शेळके

Amit Shah On Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांसाठी कमी मतदान झाल्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मे महिन्यात देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी माघार घेतल्याने बाजारात मोठी घसरण झाली आहे.

कमी मतदानामुळे सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना फटका बसू शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. या भीतीमुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र या घसरणीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले असून, घसरणीदरम्यान शेअर बाजारात खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

अमित शहा म्हणाले, "सट्टेबाजीमुळे बाजार घसरला असला तरी, 4 जून (निवडणूक निकालाची तारीख) आधी शेअर्स खरेदी करा ते वेगाने वाढतील." ते पुढे म्हणाले, “मी शेअर बाजाराचे मूल्यांकन करू शकत नाही, परंतु सामान्यतः जेव्हा स्थिर सरकार येते तेव्हा शेअर बाजार वाढतो. म्हणूनच मी म्हणतोय की 400 पार होणार आहे आणि मोदीजींचे स्थिर सरकार येणार आहे. निश्चितपणे शेअर बाजार वर जाणार आहे."

शेअर बाजारातील घसरणीबद्दल काळजी करण्याची गरज नाही

एनडीटीव्ही प्रॉफिटने दिलेल्या वृत्तानुसार, अमित शाह म्हणाले की, 'शेअर बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. यापूर्वीही 16 वेळा शेअर बाजार घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे.

आजही म्हणजेच सोमवार, 13 मे रोजी दुपारी 1:40 वाजता BSE सेन्सेक्स 0.55 टक्क्यांच्या घसरणीसह 72,261.45 वर व्यवहार करत होता. पाच व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 2.02 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत सेन्सेक्स 11.28 टक्के आणि वर्षभरात सुमारे 16 टक्के वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT